लोकदर्शन 👉 राहुल खरात
महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ठ तमाशापार्टीत गणना झालेला व सध्या राज्यभर गाजत असलेला लता लंका पाचेगावकर सह जयसिंग पाचेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला जिल्हा सोलापूर येथील तमाशात गेली कित्येक वर्ष सर्वोत्कृष्ट सोंगाड्या म्हणून काम करणारा हरहुन्नरी कलावंत *बालम पाचेगावकर* हे काल रात्री तासगाव तालुक्यातील चिखलगोठण येथे तमाशासाठी आलेले असताना वाझरला येऊन मारुती शिरतोडे सर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिरतोडे कुटुंबियांच्या वतीने तमाशातील या सर्वोत्कृष्ट सोंगाड्याचा शाल श्रीफळ आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. बालम पाचेगावकर या तमाशातील सर्वोत्कृष्ट सोंगाड्याच्या जीवनावर मारुती शिरतोडे सर यांनी फेसबुकवर, व्हाट्सअपवर,विविध दैनिकातून लेखन करून प्रकाश टाकला होता.त्यामुळे तमाशातील कलावंताचे जगणे प्रकर्षाने समाजासमोर आले व या कलावंतास समाजातून भरभरून मदत झाली होती.अशा या कलावंतांने आज प्रत्यक्ष शिरतोडे सरांचे घरी येऊन सरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.यावेळी सौ व श्री.शिरतोडे,वैभव,विशाल,विक्रम उपस्थित होते.