अमलनाला व पकडीगुडम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही उपलब्ध करून द्यावे,,, प्रशांत चटप।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
गडचांदूर जवळ असलेल्या अमलनाला धरणाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी अनंतराव फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक प्रशान्त चटप यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग,जलसिंचन विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनातुन केली आहे.
अनंतराव फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत राजुरा कोरपना तालुक्यातील जवळपास 12000 शेतकऱ्यांचा गट निर्माण केला असून कंपनी ला लागणारा कच्चा माल म्हणजे हत्ती गवत ची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे,एकरी 2 लक्ष रुपये उत्पादन होणाऱ्या या पिकाला बारमाही पाणी उपलब्ध होणे गरजेचे असल्याने राजुरा तालुक्यातील अमलनाला व कोरपना तालुक्यातील पकडीगुडम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना वर्षभर उपलब्ध करावे अशी मागणी केली आहे.
सदर कंपनी द्वारे सी,एन, जि, गॅस ची निर्मिती होणार असून यात शेतकऱ्यांचे फार मोठे योगदान राहणार आहेत,शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहेत, तेव्हा पाटबंधारे विभागाने पाणी उपलब्धता तपासून धरणाचे पाणी बारमाही उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
कार्यकारी अभियंता श्री काळे यांनी सुद्धा दोन्ही धरणाचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहेत, शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर जपून करावा तसेच कंपनी ने सुद्धा योग्य नियोजन करावे अशा सूचना कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *