लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
आयु. चांगदेव भगवानराव उपरे मु. हरदोना खुर्द
यांनी आपले वडील दिवंगत भगवानराव उपरे यांच्या वर्ष स्मरण दिनानिमित्त दिनांक १३ मार्च ला
आपल्या हरदोना येथील राहत्या घरी पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन दर रविवारी धम्म आपल्या दारी या धम्म जागृती अभियानाचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयु. उषा आयु.चांगदेव उपरे यांनी तथागत बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच आई-वडील यांच्या प्रतिमेला पुष्पहार, पुष्प अर्पण करून जयभीम आणि बुद्ध पुजा पाठ करून करण्यात आले.*
*सदर छोटेखानी कार्यक्रमांत बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक यांनी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातून बुद्ध वंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तद्नंतर उमरे यांनी आपल्या मनोगतात या भागातील सुपरिचित व सर्व धर्मिय कार्यक्रमात हिरारीने भाग घेणारे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत भगवानराव उपरे यांना विनम्र आदरांजली वाहली. तसेच दि. १३ मार्च हा दिवस भगवानराव उपरे यांच्या स्मरण दिवसा सोबतच या दिवसाची नाळ बाबासाहेबांच्या चळवळीच्या समता सैनिक दलाच्या स्थापना दिनाचे असल्याचे सांगितले. आजच्या दिनाचे अत्यंत खास महत्त्व सांगताना आजच्या दिवशी १३ मार्च १९२७ रोज महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यक्रमाला प्रस्तापित वर्णवर्चस्ववादी उलथवून टाकून आपल्या गरीब, बहिष्कृत व निष्पाप समाज बांधवांवर अन्याय- अत्याचार करतील म्हणून सामाजिक संरक्षणाची ढाल करण्यासाठी आपले उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. हा दिवस आवर्जून लक्षात रहावा म्हणून विशेषत: सणावारापेक्षा मोठा दिवस म्हणून साजरा.*करण्याचे आवाहन उमरे यांनी केले. तसेच नानाविध नेत्यांच्या संघटनेतून आपल्या विचारांचे आणि मतांचे ध्रुवीकरण होत बाबासाहेबांचे प्रामाणिक, नेक व निष्ठावान अनुयायी कार्यकर्ते बनण्यासाठी बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने बहाल केलेल्या समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच संघटना स्विकारून कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले.*
कार्यक्रमास अशोककुमार उमरे, चांगदेव भगवानराव उपरे, उषा चांगदेव उपरे, संघपाल नारायण उपरे, दामोदर झाडे, चंद्रप्रभा नारायण उपरे, सुचिता प्रणय उपरे, केशरताई सुधाकर कातकर, ज्योती शिवाजी धोंगडे, दिशा संघपाल उपरे, वेदांती प्रमोद पेरगार, जमनादास रायपूरे कार्यक्रमास उपस्थित होते.