लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
*⭕क्रांतीवीर बाबुरावजींचे बलिदान भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देईल – हंसराज अहीर*
चंद्रपूर – महान कांतीकारी, स्वातंत्रयसेनानी, भारत मातेचे सुपुत्रा वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची 189 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहिदवीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीच्या वतीने जिल्हा कारागृहातील पवित्रा शहिद स्थळावर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हंसराज अहीर व स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच उपस्थित समाज बांधवांनी बाबुरावजींच्या शौर्याचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहीली.
या कार्यक्रमात स्मारक समितीचे अध्यक्ष दयालाल कन्नाके, उपाध्यक्ष विलास मसराम, भाजपा नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, गणेश गेडाम, धनराज कोवे, साई मडावी, कमलेश आत्राम, अनिल सिडाम, एकनाथ कन्नाके, कमलाकर आत्राम, राजेंद्र धुर्वे, नगसरसेविका माया उईके, चंद्रकला सोयाम, शितल कुळमेथे, शितल आत्राम, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, मोहन चैधरी, शाम कनकम, प्रदील किरमे, राजु घरोटे, विनोद शेरकी, पुनम तिवारी, विकास खटी, सुदामा यादव, बाळु कोतपल्लीवार, गौतम यादव, सचिन डोहे, विनोद खेवले, विजय आगरे यांचेसह अनेकांनी शहिदवीरास नमन केले.
याप्रसंगी पूर्व केंद्रीय राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी शुर योध्दा असलेल्या बाबुरावजी शेडमाके यांनी अल्पवयात बलाढ्य ब्रिटीश सत्तेविरूध्द त्यांनी अवलंबीलेल्या अन्यायाविरूध्द सशस्त्रा क्रांतीचे हत्यार उपसुन ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले. असामान्य शौर्याच्या या महान क्रांतीकारकास दगा देवून पकडले व फाशीची शिक्षा दिली. मायभूमिच्या रक्षणासाठी बाबुरावजींचे बलिदान भावी कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन केले.
स्व. सुशिलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली, चंद्रपूर येथील विद्याथ्र्यांनी सुध्दा या जयंतीउत्सवात सहभागी होवून या महान क्रांतीकारकास भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली.