लोकदर्शनसंकलन -👉 साहेबराव माने.
पुणे. 9028261973
6 मार्च 2022.
दोन वर्षे लॉकडाऊनमुळे शेतीसोबत मोटार रिवायंडिंगचे काम करणारा मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील दीपक नाईकनवरे याला प्रयोग करता करता एक अफलातून आयडिया आली.
सध्या रशिया आणि युक्रेन च्या युद्धामुळे पेट्रोलचे भाव गगनाला भिडणार असल्याच्या बातम्या येत असल्याने सर्वसामान्य नागरिक धास्तावला आहे. मात्र यासर्वांवर एक नामी उपाय आपल्या एका शेतकऱ्याच्या पोराने शोधून काढला असून त्यांनी बनविलेल्या मोटारसायकलला तुम्ही कितीही पळवा आणि तेही फुकट. या गावाकडच्या देशी रँचो ने केलेला हा अफलातून जुगाड पाहता ही गाडी जर बाजारात आली तर सध्याच्या इलेक्ट्रिक बाईक बनविणाऱ्या कंपन्यांना मोठे आव्हान ठरणार आहे.
दोन वर्षे लॉकडाऊनमुळे शेतीसोबत मोटार रिवायंडिंगचे काम करणारा मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील दीपक नाईकनवरे याला प्रयोग करता करता एक अफलातून आयडिया आली आणि त्याने त्याचेवर काम देखील सुरु केले . सध्या विजेवर चालणाऱ्या अनेक गाड्या बाजारात आल्या आहेत मात्र सगळ्या गाडयांना चार्जिंग करण्यासाठी वेळ द्यावा लागतो आहे. या पट्ठ्याने हाच दोष दूर करीत गाडी बंद असली तरी त्याचे चार्जिंग होत राहील अशी व्यवस्था केली आणि त्याने बनवलेली हि गाडी कितीही किलोमीटर पर्यंत तुम्ही फुकटात चालवू शकता. अगदी घरातील वीज गेली तरी याच गाडीला वायर जोडून तुम्ही दिवे किंवा इतर उपकरणे देखील चालवू शकता . दीपक तर शेतातील फवारणीसाठी देखील आपल्या या गाडीचा वापर करतो .
दीपकने आपल्या गाडीत सध्या 48 व्होल्टच्या बॅटरी बसविल्या आहेत. याशिवाय या बॅटरी चार्ज करण्यासाठी काही विद्युत उपकरणे आणि 750 वॅट ची मोटार बसवली आहे ज्यावर हि मोटारसायकल झनाट पळते . घरातील जुन्या हिरो होंडा या दुचाकीवर त्याने हे सर्व प्रयोग केले असून आता त्याची गाडी बंद असली तरी चार्ज होत राहते आणि सुरु असताना तर सांगायची गरजच नाही. हि गाडी दाखवायला दीपक १०० किलोमीटरचा प्रवास करून आला होता. आता त्याच्या गाडीत पेट्रोल किंवा कोणते ऑइल नसल्याने ती 100 टक्के प्रदूषण मुक्त तर आहेच शिवाय एक रुपयाही खर्च न करता वाटेल तेवढे किलोमीटर आणि तेही फुकटात चालू शकते. यासाठी सुरुवातीला त्याला जुन्या गाडीवर ४० ते ५० हजाराचा खर्च करावा लागला असला तरी याचे पेटंट मिळाल्यास ती अतिशय कमी खर्चात आणि अत्याधुनिक रीतीने बनवणे शक्य होणार असल्याचे दीपक सांगतो. सध्या दिपकची हि गाडी शेतकरी वर्गात चर्चेचा विषय ठरली असून त्याला एखाद्या मोठ्या संस्थेची साथ मिळाली तर सध्या बाजारात असणाऱ्या विजेच्या गाडयांमध्ये हि सर्वोत्तम ठरू शकणार आहे. सध्याच्या अस्थिर वातावरणात पेट्रोलच्या चढत्या दरा मुळे दुचाकी वापरणे खूपच खर्चिक बनत चालले असताना दिपकचा हा देशी जुगाड भल्या भाल्याची मती गुंग करायला लावेल . याची गाडी बंद असली तरी चारचिंग होते आणि त्यामध्ये 250 व्होल्ट वीज पुरवठा तयार होतो, हे मल्टीमीटर लावून दिसू शकते. एकंदर सध्या बाजारात येत असणाऱ्या विजेच्या गाड्यांसाठी तज्ञ अभियंते विविध प्रयोग करीत असताना एका शेतकऱ्याच्या पोराचा हा अनोखा जुगाड नक्कीच संशोधकांना विचार करायला भाग पाडणारा आहे. दिपकचा हा देशी जुगाड तुम्हालाही नक्की आवडेल.
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973
6 मार्च 2022.