लोकदर्शन विभागय (प्रतिनिधी ) राहुल खरात दि . ५, मार्च २०२२
धावडवाडी सह वंचित गावांनाही टेंभूचे पाणी मिळणार असून मंजुर प्रस्तावासाठी निधी मंजुरीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव गेला आहे . या वंचित गावाच्या बंदिस्त पाणी योजनेचा शुभारंभ राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते लवकरच करणार आहोत असे मत पाणी चळवळीचे नेते आनंदरावबापू पाटील यांनी व्यक्त केले .
धावडवाडी च्या प्रमुख मान्यवरांसह आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक, खरसुंडी पश्चिम भागाचे नेते विलासराव नाना शिंदे यांनी खरसुंडी पठारावरील टेंभूची पाईपलाईन, घरनिकी ते हिवतड जाणारा धावडवाडी लगतचा एक्सप्रेस कॅनॉल यांची पाहणी केली .
धावडवाडी परिसराला सदयस्थितीत माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्या च्या पार्श्वभूमी वर धावडवाडी च्या मान्यवरांनी टेंभूचे पाणी पश्चिम भागाला लवकरात लवकर मिळावे म्हणून मान्यवरांसमोर अपेक्षा व्यक्त केली .
धावडवाडी, औटेवाडीचा पश्चिम भाग, वलवण,राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी ( दिघंची ), उंबरगांव, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी,गुळेवाडी, विभूतवाडी, चिंचाळे आणि खरसुंडीचा पश्चिम भाग या वंचित गावे आणि भागाचा समावेश टेंभूत समावेश झाला आहे . या मंजूर प्रस्तावाच्या निधी मंजुरीसाठीचा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल . राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीत होणाऱ्या शुभारंभाच्या कार्यक्रमाची तारीख निश्चितीसाठी डॉ .भारत पाटणकर यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळ येत्या ८ – ९ मार्चला पवार साहेबांना भेटणार आहे . असे ही आनंदराव बापू पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले .
धावडवाडी करांच्या स्थळ पाहणी दौर्यात इस्माईलशेठ शेख, अलीभाई शेख, काशीम शेख, नुरमहंमद शेख, भिकू शेख, आयुबअली शेख, मुस्ताक शेख,हजरत शेख, बटू शेख, इसाक शेख, शकुर शेख, सलाउद्दीन शेख, इनुस शेख, दाऊद शेख, निसार शेख, गणी शेख, महंमद शेख, जाकीर शेख,शरीफ शेख, समशेर शेख, दिलावर शेख, अझरूदीन शेख, हरुण मिस्त्री शेख, आदम शेख, खलील शेख, सानीज शेख, शाबाज शेख, फैजल शेख, अय्याज शेख, सिराज शेख, युसुफ शेख उर्फ लालुभाई आब्बासअली शेख, अजय म्हारनुर इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते .