लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,,
प्रधानमन्त्री घरकुल योजना सन 2021-22मध्ये मंजूर घरकुल लाभार्थी यांना घराचे बांधकाम करण्या करिता ज्यांचे शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे. त्यांना नियामाकुल करण्यात यावे अशी मागणी . मा तहसीलदार कोरपना यांना निवेदन देऊन करण्यात आली,
*यावेळी श्री संभाजी कोवे सदस्य पंचायत समिती कोरपना ,. श्री उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर ,श्री सुदर्शन डवरे,सामाजिक कार्यकर्ते कैलास उपस्थित होते*.
तसेच सन 2016,,,2017 व 2018 मध्ये ग्राम सभेतून घरकुल योजना करिता ड यादी तयार करण्यात आली परंतु शासनाच्या जाचक अटी मुळे पात्र लाभार्थी अपात्र झाले. त्यांना पात्र करण्या करिता ग्राम पंचायतनी ग्राम सभा आयोजित करावी व पात्र लाभार्थी ची निवड करून तसा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली आहे, एकूण 52 ग्राम पंचायत कोरपना तालुक्यातील आहे. परंतु सध्या फक्त आठ ग्राम पंचायत नी प्रस्ताव सादर केला आहे.निवेदनाच्या प्रतिलिपी मा गट विकास अधिकारी कोरपना
मा जिल्हाधिकारी चंद्रपूर,मा मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत
घरकुल मंजूर झाले आहे पण त्यांच्या नावाची जागा नसल्या मुळे त्यांना घरकुल पासून वंचित राहू नये म्हणून कमेटी गठित करण्यात आली आहे. मा उपविभागीय अधिकारी राजुरा मा तहसीलदार कोरपना व गट विकास अधिकारी कोरपना अशी कमिटी गठित असून लवकरात लवकर तालुक्यातील घरकुल नियामाकुल करण्यात यावे अशी मागणी केली आहे,
जे घरकुल पात्र लाभार्थी असून चुकीच्या पद्धतीने सर्वे केल्यामुळे ती अपात्र झाली आहे. त्यांची पुन्हा चौकशी करून तसा प्रस्ताव ग्राम पंचायत नी मा. गट विकास अधिकारी कोरपना यांच्या मार्फत मा मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्या कडे त्वरित सादर करण्यात यावा अशी मागणी केली आहेत,
,