लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथील पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. यावर्षीही भाविकांचा मोठ्या प्रमाणात जनसागर उसळनार आहे.
अंतरगाव येथील महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. अनेक दशकापासून येथे मोठ्या श्रद्धेने भाविक दर्शनासाठी येतात.या मंदिरात शिवलिंग सह पवनदेव, श्रीकृष्ण, लक्ष्मी, विष्णू , नागदेव , गणपती आदी देवतांच्या मूर्ती स्थापित आहे. सदर मंदिर भोसले राजवटीत बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या मंदिरालगतच श्रीराम मंदिर आहे. येथे दरवर्षी मोठा रामनवमी उत्सव साजरा होतो. या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन मंदिर परिसराचा विकास घडवून आणावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे.