लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
कोरपना तालुक्यातील पारडी ( अकोला ) येथील शिव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय दिनांक १ , २ मार्चला यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त भाविकांचा जनसागर उसळनार आहे.
सदर मंदिर कोरपना – आदीलाबाद राष्ट्रीय महामार्गावर असल्याने बारमाही महाराष्ट्र सह तेलंगणातील भाविकांचा नियमित राबता असतो.
१९८० मध्ये लगतच्या
अकोला येथील मधुकर पुरके नामक गुराखी हे गायी चारत असताना. आजच्या मंदिर स्थित जागेच्या लगत असलेल्या टेंभरीच्या झाडाजवळ त्यांना शिवजीचा दृष्टांत झाला. त्या स्थानी
त्रिशूल ची स्थापना करून नंतर मूर्तीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. १९९२ च्या सुमारास मंदिराचे बांधकाम करण्यात आले. तेव्हापासून येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते असल्याची माहिती पारडी येथील ग्रामस्थ सुरेश कोटावार यांनी दिली. या स्थळाला तीर्थक्षेत्राचा ही दर्जा देण्यात आला आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर लाभलेल्या नेहमीच येथे गर्दी दिसून येते.