लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा :– गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि गोंडवाना विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य डॉ.संजय गोरे यांच्या राज्यशास्त्र विषयावरील विविध चार संदर्भ ग्रंथ पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित समारंभात करण्यात आले आहे.
प्रा.डॉ.संजय गोरे यांनी लिहिलेले महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायतराज व आदिवासी नेतृत्व, भारतीय लोकशाही(सिद्धांत आणि व्यवहार)व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे नेतृत्व अश्या राज्यशास्त्रातील विविध घटक आणि संकल्पना समाविष्ट असलेल्या एकूण 4 सदर संदर्भ ग्रंथ पुस्तकांचे नुकतेच महाविद्यालयाच्या सभागृहात समारंभपूर्वक प्रकाशन झाले असून सदर संदर्भग्रंथांचे प्रकाशन वर्धा येथील सेवानिवृत्त ज्येष्ठ प्राध्यापक श्री चिंतामण कोंगरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले, उपाध्यक्ष श्री. तुळशीराम पुंजेकर,संचालक नोगराज मंगरूळकर माधवराव मंदे, प्राचार्य संजय कुमार सिंग,डॉ.आय.जे,राव, माजी विध्यार्थी समितीचे अध्यक्ष आशिष देरकर इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सदर संदर्भ ग्रंथ राज्यशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तसेच संशोधक विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा विश्वास डॉ.संजय गोरे यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. शरद बेलोरकर यांनी केले तर आभार डॉ.राजेश गायधनी यांनी मानले यावेळी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.