वालुर/प्रतिनिधी
वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उतसाहात साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बि.व्हि.बुधवंत, एस. ए.महाडिक, डि.आर.नाईकनवरे, आरबि.राठोड, जि.एम. कावळे, व्हि.एम.बोंडे, सौ.एस. आर.सोनवणे आदी होते. यावेळी थोर शासत्रज्ञ सि.व्हि.रमण यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेस पुष्पहार अरपण करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व बि.व्हि.बुधवंत, एस. ए.महाडिक यांनी आपल्या भाषणातून विशद केले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रयोगांचे प्रात्याक्षिके दाखवून विज्ञान विषयाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचा समरोप एस.डि.भोकरे यांच्या अध्यक्षक्षीय भाषणाने झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार महादेव ग गिरी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमाकांत क्षिरसागर, बि.एम.शेंबडे, कैलास राऊत यांनी परीश्रम घेतले.