मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसल्याने जनमताचा रेटा वाढवला पाहिजे— मराठी भाषा गौरव समारंभात प्रो.डाॅ.शिवाजीराव देशमुख यांचे प्रतिपादन

——————————————
लोकदर्शन उस्मानाबाद(विभागीय,) (प्रतिनिधी)दि.२७👉राहुल खरात

मराठी भाषेला दिड ते दोन हजार वर्षाची परंपरा असून मराठी भाषेच्या अनेक बोली भाषा आजही बोलल्या जातात व चांगले संस्कार व मूल्ये रूजविण्याचे काम मराठी भाषा करत आहे मराठवाड्याच्या मातीत ‘विवेकसिंधू” “लिळाचरिञासारखे”ग्रंथ निर्माण झाल्याने मराठीच्या जन्मखुना येथेच आहेत व आज दलित साहित्य विश्वव्यापी झाल्याने त्याचा ऊगम ही मराठवाड्यातच आहे.आज देशामध्ये मराठी भाषा बोलणाराची संख्या तेरा कोटी असून अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी जे निकष आहेत ते पूर्ण असूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही ही शोकांतिका असून राजकारण्यांच्या श्रेयवादात मराठी भाषा अडकली आहे हे सध्या दिसते आहे.ही मराठी भाषेची व माणसांची गळचेपीच आहे त्यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आता सामान्य मराठी मानसांनेच जनमताचा रेटा वाढवला पाहिजे असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभाग व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबईचे विभागीय केंद्र उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित २७फेब्रुवारी वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्मदिनी”मराठी भाषा गौरव समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्रोफेसर डाॅ.शिवाजीराव देशमुख(तुळजाभवानी महा,तुळजापूर)यांनी केले आहे.समारंभाच्या अध्यक्षस्थानी जीवनराव गोरे(य.च.प्रतिष्ठान उस्मानाबादचे अध्यक्ष)हे होते.
प्रारंभी प्रमुख वक्ते व मान्यवरांनी वि.वा.शिरवाडकर यांचे प्रतिमाचे पुजन केले यावेळी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.
पुढे बोलताना प्रो.शिवाजीराव देशमुख म्हणाले की,
जागतिक स्तरावर मराठी भाषा विसाव्या स्थानी आहे तर देशस्तरावर तिस—या स्थानी आहे. आजचा दिवस वि.वा.शिरवाडकरांच्या साहित्य लेखनाच्या कार्य कर्तुत्वाचा व मराठी भाषेच्या गौरवाचा आहे.आज इंटरनेटमुळे माणसं दुरावली जात आहेत.बदलत्या काळात नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत, वंचित, उपेक्षित माणसं आजही विकासापासून वंचित आहेत.आज चंगळवाद वाढला आहे.मानवी मूल्यांची मोडतोड होत आहे. साहित्यिकांनी त्याच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. आंधळेपणाने इंग्रजीचे समर्थन करता कामा नये आज दर्जेदार साहित्य निर्माण झाले पाहिजे.
व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सामान्य माणसांनी जनमताठा रेटा लावलाच पाहिजे असे त्यांनी शेवटी आवाहन केले आहे.
अध्यक्षीय समारोप करताना जीवनराव गोरे म्हणाले की,आपली मातृभाषा हाच आपला स्वाभिमान आहे.आपली मराठी भाषा संस्कार करण्याचे काम करते आज मराठी साहित्य विपुल आहे ते विश्वव्यापी होण्यासाठी इतर भाषेतून अनुवादित झाले पाहिजे अनेक माणसं जन्माला येतात आणि जातात परंतू त्यांचे कार्य अमर राहाते तसेच कार्य वि.वा.शिरवाडकरांचे आहे.आजच्या विद्यार्थ्यांनी चांगले वाचन करावे व चांगला श्रोता झाला पाहिजे.शब्दकोश तयार झाले पाहिजेत कारण आपल्सा भाषेतूनच संस्कृतीचे जतन केले जाते.
यावेळी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख,प्राचार्य डाॅ.रमेश दापके,नितीन तावडे,एम.डी.देशमुख यांनी मराठी भाषेच्या गौरवा संबंधी मनोगते व्यक्त केली.यावेळी यशवंतराव चव्हान प्रतिष्ठानचे भा.नं.शेळके,मूख्याध्यापक टेकाळे,बालाजी तांबे,जगदाळे मॅडम,तुमसुम सय्यद,यांचेबरोबरच उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,कवी पंडित कांबळे,राम गरड,राजेंद्र अञे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड यांनी केले सूञसंचालन प्रा.वैभव आगळे यांनी केले.आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *