,,लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर,,
संघर्ष युवा मंच पिंपळगाव, जिजाऊ सखी मंच,पिंपळगाव तथा समस्त पिंपळगाव ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्द्यमाने दोन दिवसयीय शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी – .श्री.राजकुमार पानघाटे (त.मु.अ.) होते. विशेष उपस्थिती मध्ये– श्री.प्रशांत नागपुरे ( पो.पाटील ) श्री.कुंभारे साहेब ( कार्यक्रम अधिकारी ACF ) होते, मागिल तिन वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पिंपळगव येथे साजरी करण्यात येत आहे . गावातील तरुन तसेच तरुनी व गावातील नागरिक याच्या विशेष उपस्थिती मध्ये संघर्ष युवा मंच तथा जिजाऊ सखी मंच याच्या सहभागातुन शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली . गावातील महिला प्रवर्गासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले गेले, गावातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या . तसेच सायंकाळी प्रा..दिलिप चौधरी यांचे शिवचरित्र जाहिर व्याख्यान झाले. १९ फ्रेब्रुवारी ला दुपारी ३ वाजता भव्य शोभायात्रा काढली आणि रात्री ०८ वाजता सांस्कृतीक स्पर्धा घेण्यात आली . त्या स्पर्धा साठी परीक्षक शिवाजी मालेकर , गुणवंत खोरगडे यांनी कार्य केले. याप्रसंगी समस्त शिक्षक वृद जि.प.उ.प्रा.शाळा पिंपळगाव तथा गावकरी उपस्थित होते.