लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे 15 व्या वित्त आयोग अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी नवीन ट्यूबवेल व वाल दुरुस्ती, 100% नळ कनेक्शन तसेच मानव विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधी येथील भोजन कक्ष बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
‘गावाचा विकास हाच आमचा ध्यास ‘ या ध्येयाने प्रेरित ग्रामपंचायत सिंधी कार्यकारिणीच्या पाठपुराव्यामुळे वरील तीनही विकासकामांचे भूमिपूजन उपसभापती मंगेश गुरनुले, माजी सभापती तथा प स सदस्य कुंदाताई जेणेकर, विरूर स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, कृ.उ.बा.स राजुराचे माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे, सिंधीचे सरपंच शोभाताई रायपल्ले, उपसरपंच रामभाऊ ढुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी जि. प. उच्च प्राथ. शाळा सिंधी येथील विषय शिक्षिका रंजीता चापले या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच NET मराठी विषयात उत्तीर्ण झाल्याबद्दल आणि विरूर स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत सिंधी तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ग्रा प सदस्य सपनाताई दामेलवर, सोनुबाई सिडाम, गिताबाई धानोरकर, पोलीस पाटील सुनिताबाई धानोरकर, मंगेश रायपल्ले, राजू दामेलवार, मधुकर धानोरकर, भास्कर मोरे, हेमंत दाते यासह कर्मचारी, शिक्षक आणि गावातील नागरिक उपस्थित होते.