* आपणही हे करू शकतो
दोन वर्षांपासून आपल्याला बॅटरी वर चालणारी सायकल मिळावी म्हणून चंद्रपूर जिल्यातील नवरगावच्या *वत्सलाबाई बावणे* (७५) या दिव्यांग मावशीने खूप प्रयत्न केले, मात्र व्यर्थ. म्हातारपणामुळे तिच्याकडे असलेल्या जुन्या सायकलला हाताने पैडल मारणे तिला फार कस्टदायी झाले होते.
काही पक्षाच्या कार्यकर्ते मंडळीनी triसायकल साठी आवश्यक असलेली मावशीची कागदपत्रे आपापल्या आमदाराच्या कार्यालयातही पाठवलीत. जिल्ह्यातील एका आमदाराच्या खोटारड्या PA ने तर सायकल बुक केली आहे, आज येतेय उद्या येतेय, दुसऱ्याच गावी पोचली, आली पण चुकीची होती, त्यामुळे परत पाठवली वैगरे वैगरे सांगून वर्षभर टाईमपास केला. मात्र सायकल अखेरपर्यंत दिसलीच नाही. एका आमदाराने तो क्षेत्र आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही म्हणून हात वर केले, तर एका आमदाराच्या कार्यकर्त्याने तर ही अमुक अमुक एका पक्षाला मतदान करते त्यामुळे आपल्या कोट्यातून हिला सायकल द्यायची नाही म्हणून निर्णय पण देऊन टाकला. हतबल झालेल्या त्या वृद्ध महिलेची केविलवाणी अवस्था बघून आता *आसरा कडून* तिला ही मदत करायची असे मनात आले. तासाभरात आसराच्या मोजक्या सदस्यांनी आपापसात चर्चा करून 40 हजार रुपये वर्गणी गोळा करून इंदोर च्या एका tri सायकल कंपनीकडून सायकल विकत घेतली आणि मावशीला भेट दिली. मावशी आपसूकच भावनिक झाली.तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
आज ती सन्मानाने आणि बिना त्रासाने गावात फिरते, सायकलच्या सहायाने आपली सर्व कामे करते.
कुणाला मदत करायची भावना प्रबळ आणि प्रामाणिक असेल तर आपणच ही सामाजिक जबाबदारी पार पाडू शकतो. वारंवार लोकप्रतिनिधीसमोर हात पसरण्यापेक्षा आपल्यापासूनच सुरुवात करा हेच *आसरा* च्या माध्यमातून सांगावेसे वाटते.
एक सदस्य
*आसरा*
******
साभार : सदानंद बोरकर यांची फेसबुक पोस्ट