लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत
जिवती÷विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवतीच्या सांस्कृतिक विभागातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ज्या-ज्या महापुरुषांनी भारतीय स्वातंत्र्य करिता आपले प्राण पणाला लावले त्यांचे कार्य व विचार आत्मसात करून देशाच्या स्वातंत्र्याला अबाधित राखण्याचे महत्त्वपूर्ण कर्तव्य आजच्या पिढीला करावे लागेल. तेव्हाच त्या थोर महापुरुषांच्या बलिदानाची परतफेड होतील. असे मनोगत व्यक्त केले तर आपणही या देशाचे नागरिक आहोत, देशाला कसे प्रगतीपथावर नेता येतील व विश्वात कसा भारत शोभून दिसेल याकरिता प्रयत्न करत राहिले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. लांडगे यांनी मांडले या स्पर्धेकरिता बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात प्रथम कु. मोनिका राठोड द्वितीय कु.ममता मुगावे तर तृतीय कुमारी ऐश्वर्या कोनाळे यांनी क्रमांक पटकावला कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राऊत तर आभार प्रा. मुंडे यांनी मानले. परीक्षक म्हणून प्रा. देशमुख, प्रा. साबळे, प्रा. मंगाम यांनी कार्य पार पाडले तर प्रा. तेलंग, प्रा. मस्कले, प्रा. डॉ. पानघाटे प्रा. वासाडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.