लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕राजुरा शहरातील नागरिकांना ५९३ घरकुल मंजूर.
राजुरा :– नगर परिषद राजुराद्वारे मागील पाच वर्षापासून लोकहिताच्या अनेक योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने सुरू आहे. शहरातील गोरगरीब, गरजू लाभार्थींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे आणि त्यांचे सहकारी विशेष प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील ५९३ लाभार्थी नागरिकांना घरकुल मंजूर झाले आहेत. यात पहिल्या टप्प्यात १६० घरकुल व दुसऱ्या टप्प्यात ४३३ असे एकूण ५९३ घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. सदर अनुदान केंद्र शासन व राज्य शासनाचा सयुंक्त उपक्रमाद्वारे राबविले जाते. पात्र लाभार्थ्यांना एकूण रु – 2,50,000/- रक्कम अनुदान दिले जाते. मध्यंतरी काही कारणास्तव निधीची कमतरता झाल्याने कामे रखडली होती मात्र नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नाने खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे निधीची उपलब्धता झाली असून लवकरच सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
नगर परिषद राजूरा द्वारा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत योजनेचा दुसरा टप्पा सुरू असून या अंतर्गत रजिस्टर्ड जागेवर व गावठाण हद्दीतील लोकांना सुद्धा घरकुल मंजूर होणार आहेत. तर योजनेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत परवडणारे घरकुल, किरायाने राहणारे व अतिक्रमण धारक नागरिकांना सुद्धा हक्काचे घर देण्याचे नियोजन चालू होणार आहे. या योजनेत सहभागी होऊन अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले आहे.