लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
भारतीय स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव निमित्ताने सूर्यनमस्कार प्रकल्प शालेय विद्यार्थी कडून राबविण्याबाबत शिक्षण विभागाचे वतीने आदेश जरी करण्यात आले होते.त्या अनुषंगाने स्थानिक महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापिका सौ,स्मिता चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार प्रकल्प यशस्वी रीतीने राबविण्यात आला,
शारीरिक शिक्षक बबन भोयर, संजय झाडे,अमोल शेळके, प्रा. प्रशांत पवार यांनी स्वतः विद्यार्थ्यांना ऑनलाइन सूर्यनमस्कार करून दाखविले,व विद्यार्थ्यांना स्वतः च्या घरी किंवा पटांगणावर किमान 13 सूर्यनमस्कार करून त्या चा व्हीडिओ पाठविण्यास सांगितले होते.त्या नुसार दिनांक 19 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान एकूण 160 विद्यार्थ्यांनी 1200 सूर्यनमस्कार घातले,व विक्रम केला,पतंजली योगपीठ चे प्रमुख स्वामी बाबा रामदेव व इतरांनी शाळेला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,
ऑनलाइन सूर्यनमस्कार प्रकल्प यशस्वी रीतीने पूर्ण केल्या बदल मार्गदर्शक शिक्षक वृंदा चे अभिनंदन केले आहेत,