लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– भारतरत्न, पद्मभूषण जगप्रसिद्ध पार्श्वगायिका, स्वरसम्राज्ञी, गाणकोकिळा लता मंगेशकर जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई येथे कोरोना आणि न्युमोनिया संदर्भात उपचार सुरू होते. अनेक तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार देत होते. मात्र आज सकाळी ८ : १५ सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्या फक्त महाराष्ट्रात, भारतातच नव्हे तर जगात किर्तीवंत होत्या, त्यांनी गायलेली गाणी अजरामर आहेत. त्या गाण्याच्या स्वरूपात कायम आपल्या सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने देशाच्या सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.. ओम शांती.. अशा शब्दांत आपल्या शोकसंदेशातून आमदार सुभाष धोटे यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.