लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- ०२/०२/२०२२ :-* सोलापूरात ताडी दुकानाविरूध्द ताडी दुकाने बंद करावे म्हणून ताडी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मा. जिल्हाधिीकारी कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या धरणे आंदोलनात माजी पालकमंत्री व ज्येष्ठ आमदार मा. विजयकुमार देशमुख मालक यांनी सहभाग नोंदवून मा. जिल्हाधिकारी यांना शिष्ट मंडळाद्वारे निवेदन देताना जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून म्हणाले की, कलेक्टर साहेब काही करा ताडी (शिंदी) दुकाने बंद करा अशी जोरदार मागणी केली.
ताडी दुकाने संघर्ष समितीच्या वतीने आज दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णु कारमपुरी (महाराज) सोहेल शेख, व गणेश बोड्डू यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन जाहीर करण्यात आले. परंतु मा. पोलीस आयुक्तांनी धरणे आंदोलनात परवानगी नाकारल्याने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या नूसार मा. पालकमंत्री व ज्येष्ठ आमदार विजयकुमार (मालक) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना ताडी (शिंदी) दुकाने बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
सदर प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख मालक व विष्णु कारमपुरी (महाराज) सौ इंदिरा कुडक्याल यांनी पोट तिडकिने जिल्हाधिकाऱ्यांना आपले मागणी मांडताना म्हणाले की, शहरातील दाट लोकवस्तीत लोकांचा विरोध असताना देखिल परवाने कसे दिले असा सवाल करून ताडी दुकाने त्वरीत बंद करा अशी मागणी केली.
सदर प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख मालक विष्णु कारमपुरी (महाराज) विठ्ठल कुऱ्हाडकर, सोहेल शेख, गणेश बोड्डू, सौ. इंदिरा कुडक्याल, पांडुरंग दिडी (काका) रवि गोने, प्रकाश असादे, अनिल दंडगुळे, सुशिल उपलप, पडाल (सर), माणिक पाटील, रमेश म्हंताटी, सलिम शेख, लक्ष्मीबाई इप्पा, रेखा आडकी, संजीव शेट्टी, प्रशांत जक्का, मिराबाई लच्चु वाले, व्यंकटेश कैरमकोंडा, शुभम कारमपुरी, इब्राहीम पिरजादे, मुल्ला गुरुजी, प्रभु गड्डम, यांच्या सह विविध भागातील नागरीक बंधु भगिनी उपस्थित होते.
*मा. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे.* ।===========================
*फोटोमॅटर :- ताडी दुकाने परवाने रद्द करा या मागणिसाठी ताडी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना आ. विजयकुमार देशमुख, विष्णु कारमपुरी (महाराज), सौ. इंदिरा कुडक्याल, पांडुरंग दिडी (काका) सोहेल शेख, व गणेश बोड्डू आदि दिसत आहेत.*