लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- ०१/०२/२०२२ :-* सोलापुरातील विविध वाहने, इलेक्ट्रॉनिक गृहपयोगी वस्तु व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी कर्ज देणाच्या विविध फायनान्स कंपन्यांचे वसुलदार हे थकित कर्जदार लोकांना गुंडगिरी करून, व दहशत निर्माण करणे आणि वाहने किंवा वस्तु उचलून नेणे असे बेकायदीशीर कृत्य करीत आहेत अशा प्रकारामुळे कर्जदार लोकांमुध्ये भिती व दहशत निर्माण होऊन दबावाखाली जीवन जगत आहेत. या मूळे आत्महत्या करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फायनान्स कंपनी वसुलदारांच्या बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्त हरीष बैजल साहेब यांना विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळात देण्यात आला आहे.
कामगार सेनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्त मा.श्री हरीष बैजल यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूरातील विविध फायनान्स कंपन्यात महिंद्रा फायनान्स कंपनी, बजाज फायनान्स कंपनी, HDFC फायनान्स कंपनी, HERO फायनान्स कंपनी, व इतर अनेक फायनान्स कंपन्या या दुचाकी, रिक्षा, चारचाकी, आणि इलेक्टॉनिक्स साहित्य अशा वस्तू घेण्यासाठी कर्ज पूरवठा करतात. सदर कर्जाच्या रकमेस नियम बाह्य व्याज आकारतात. कर्ज वसुलीसाठी जो हप्ता ठरवलाजातो त्या हप्त्यात व्याजाचा रकमेसह हप्ता घेतात.गेल्या दोन व अडीच वर्षा पासून कोरोना प्रदर्भावामूळे व्यापारी, खाजगी नोकरदार, कंपन्यामध्ये कामकरणारे कर्मचारी, रिक्षावाले, ट्रॅव्हल्स धंदा करणारे त्यांचा धंदा पुर्ण पणे कोलमडून गेला त्यामूळे विविध फायनान्स कंपन्या दृवारे घेतलेला कर्ज न भरल्याने हप्ते थकित राहीले याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने फायनान्स द्वारे घेतलेल्या कर्ज व व्याजा बाबत सवलत देण्याचे आदेश जारी केले. परंतू फायनान्स कंपन्या या सवलत न देता जबरदस्ती व गुंडगीरी, व कर्जदाराला अपमानित करून कर्ज वसूली करण्याचे सुरुच ठेवले आहे.
कर्ज वसुली करण्यासाठी या फायनान्स कंपन्या खाजगी गूंडप्रवृत्तीच्या लोकांस ठेका देवून त्यांच्या मार्फत कर्जवसूली करतात हे ठैकेदार कर्जदारांना त्यांच्या घरी जाऊन व रस्त्यात भेटैल त्या ठिकाणी किंवा व्यापाऱ्यांच्या दुकानावर, नोकरदारांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन आर्वाच्य भाषेत शिव्या देणे जिथे भेटेल तिथे त्यांचे वाहन ओढून घेणे कर्जाचे पैशे ताबडतोब न भरल्यास रस्त्यात फिरणे कठिण होईल असे धमकावणे वेळ प्रसंगी मारहाण करणे, चार चौघात अपमानित करणे असे प्रकार करतात. या मूळे गरीब रिक्षा चालक वाहनधारक व व्यापारी फायनान्स कंपन्याच्या दबावाखाली राहून अनेकांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत यात शंका नाही खर पाहता कर्ज वसुलीसाठी कायदेशीर मार्ग अवलंबणे गरजेचे असतांना या फायनान्स कंपन्या खाजगी वसुलदार ठेवून एक प्रकारे दहशत निर्माण करीत आहेत. हे बेकायदेशीर व कर्जदारांना त्रास देण्याचा प्रकार आहे.
तरी माननियांनी फायनान्स कंपनीचा वरील गैर प्रकार थांबवून त्यांच्यावर कारवाई करांवी आणि कर्जदारांना न्याय द्यावे ही नम्र विनंती. विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली मा. पोलीस आयुक्त यांना निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात सोहेल शेख, सलीम शेख, गणेश बोड्डू, शिवा ढोकळे, रिक्षा चालक, गफुर शेख यांच्यासह कामगार सेनेचे कार्यकर्ते सामील झाले होते.===========================
*फोटो मॅटर :- सोलापूरातील विविध प्रकारचे कर्जवसुली करण्यासाठी वसुलदारांकडून करण्यात येणारा बेकायदेशीर वसुली विरोधात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले सदर प्रसंगी माध्यमांशी बोलताना विष्णु कारमपुरी (महाराज) सोहेल शेख, सलीम शेख, व कामगार सेनेचे कर्मचारी दिसत आहेत.*