लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- ३०/०१/२०२२ :-* दक्षिण सोलापूर कुंभारी येथे माँ साहेब गृहनिर्माण संस्थेच्या वतीने विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलाचा ताबा रस्ता पाणी ड्रेनेज व दिवाबत्ती या नागरी सुविधा पूर्ण होताच ताबा देण्यात येईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष :- विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी माँ साहेब गृहनिर्माण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विडी कामगारांच्या बैठकीत बोलताना दिली.
दक्षिण सोलापूर कुंभारी येथे माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेने बेघर विडी कामगारांसाठी केंद्रशासनाच्या अनुदानातून दुसऱ्या टप्प्यातील 830 घराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु रस्ता, पाणी, ड्रेनेज व दिवाबत्ती या नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने ताबा देण्यास विलंब होत आहे. म्हणून सदस्य महिला विडी कामगार महिलांनी वारवार ताबा देण्यास संस्थेकडे मागणी करीत असल्याने दिनांक :- ३०/०१/२०२२ रविवार रोजी सभासदांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित कामगारांचे स्वागत विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी केले. तर प्रास्ताविकात श्रीनिवास चिलवेरी यांनी घरे देण्यास विलंब का होतो याचे सविस्तर माहिती दिली त्याच बरोबर नागरी सुविधेसाठी संस्थेच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून नागरी सुविधा उपलब्ध लवकरात लवकर करणार असल्याचे सांगताना सभासदांनी संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन केले
त्यानंतर संस्थापक विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी आपल्या मार्गदर्शन पूर्व भाषणात बोलताना म्हणाले की आपल्या घरकुल योजनेसाठी सरकार सर्वतोपरी मदत करीत असून विशेष करून नागरी सुविधेसाठी राज्यातील ठाकरे सरकार जातीने लक्ष देवून पाणीपुरवठा योजना मंजूर केले आहे त्याचबरोबर रस्ता पाणी ड्रेनेज व दिवाबत्ती या देखील लवकरात लवकर पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली परंतु सभासद लाभार्थी महिला विडी कामगारांनी आपल्या श्
हीश्याचा रक्कम त्वरित भरावे असे आवाहन केले.
शेवटी बैठकीचे सूत्रसंचालन विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पप्पू शेख यांनी केली.
=============================
*फोटो मॅटर :- माँ साहेब विडीन कामगार संस्थेच्या बैठकीत विडी कामगार सदस्यांना मार्गदर्शन करताना विष्णू कारमपुरी (महाराज), श्रीनिवास चिलवेरी व समोर माता-भगिनी दिसत आहे*