लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- २५/०१/२०२२ :-* सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया मार्फत होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी मध्ये बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी रोखण्यासाठी लवकरच बांधकाम कामगार छानणी समिती नेमणार असल्याचे माहिती सोलापूरचे कामगार सहाय्यक आयुक्त श्री. घोडके साहेब यांनी एका बैठकीत केले असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) व गणेश बोड्डू यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे .
बांधकाम कामगारांना सामाजिक आर्थिक व आरोग्या बाबत सुरक्षा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने संयुक्त पणे बांधकाम कामगार कल्याण महामंडळ नेमणुक स्थापना करण्यात आली आहे . त्यानुसार बांधकाम नोंदणीचे अधिकार सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले . यावरून बांधकाम कामगारांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्तालयात होते . सन २०१८, २०१९, २०२० या साली तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त श्री निलेश यलगुंडे व त्यांचे सहकारी किर्ती देऊळकर यांनी संगनमताने हजारों बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी केली या बाबत महाराष्ट्र कामगार सेना व इतर कामगार संघटनांनी शासनाकडे वरील प्रकाराचे चौकशी होऊन यलगुंडे यांची निलंबनाची मागणी केली . महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचे मंत्रालयाने सोलापूर कामगार आयुक्त श्री निलेश यलगुंडे व किर्ती देऊळकर मॅडम यांची तडकाफडकी बदली केली . आणि सध्या सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून श्री गिरीष घोडके यांनी यांनी पदभार घेतले . श्री घोडके साहेब यांनी खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळावून देण्यासाठी व बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी रोखण्यासाठी बांधकाम क्षेत्रात कामकरणाऱ्या संघटना , बिल्डर असोसिएश सामाजिक संघटना कार्यकर्ते व प्रशासन असे समिती स्थापन करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे .
सहाय्यक कामगार श्री गिरीष घोडके यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेचे सेक्रेटरी- सायबण्णा लेग्गेळी , RTI कार्यकर्ते गणेश बोड्डू , मारता असादे, सतिश सिरसुल्ला व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते .
==========================
*फोटो मॅटर :- बांधकाम समिती स्थापन करण्यासाठी झालेल्या बैठकीत नोंदणी घोटाळा थांबविण्यासाठी झालेल्या बैठकित मार्गदर्शन करताना सहाय्यक कामगार आयुक्त श्री गिरीष घोडके , विष्णु कारमपुरी ( महाराज ) , मारता असादे , कामगार प्रतिनिधी , गणेश बोड्डू , सतिष सिरसुल्ला व इतर मान्यवर दिसत आहेत.*