लोकदर्शन °÷÷ शिवाजी सेलोकर
चंद्रपूर – पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या सातत्यपूर्वक हस्तक्षेपाने तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये सिध्दबल्ली इस्पात लिमी. ताडाळी येथील कामगारांचे बोनस फायनल एरीअर्स, गॅ्रच्युईटी व अन्य देय राशी मिळण्याकरीता दि. 25 जानेवारी 2022 रोजी सिध्दबल्ली व्यवस्थापनाव्दारे कंपनी परिसरात कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये कामगारांना वेतन क्लेम देण्याकरीता संबंधीत कामगारांकडुन अर्ज भरून घेण्याची प्रक्रीया राबविण्यात आली.
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी सिध्दबल्ली ईस्पात लिमी. मध्ये पूर्व कामगारांना पूर्ववत कंपनीत सामावून घेण्यात यावे तसेच त्यांना देय असलेला बोनस, फायनल एरीअर्स, ग्रॅच्युईटी तसेच अन्य देय राशी तातडीने उपलब्ध करण्यासाठी सिध्दबल्ली व्यवस्थापन, जिल्हाधिकारी तसेच अन्य संबंधीत विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून व हा प्रश्न मार्गी लावण्याकरीता जिल्हा प्रशासनाव्दारा व्यवस्थापन व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका आयोजित करून हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा याप्रश्नी गांभीर्याने पावले उचलुन सिध्दबल्लीच्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. दि. 14 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनास वेतन क्लेम देण्याच्या अनुशंगाने कॅम्पचे आयोजन करण्याच्या सुचना केल्या होत्या. यानुसार दि. 25 जानेवारी 2022 रोजी कॅम्पचे आयोजन करून कामगारांकडुन वेतन क्लेम फार्म भरून घेण्यात आले. यावेळी सिध्दबल्ली कंपनीचे अधिकारी व सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच सर्वश्री विजय आगरे, उपसरपंच ग्रामपंचायत धानोरा पिपरी, विनोद खेवले, उत्तम आमडे, संजय जुनघरे, सत्यपाल खेवले, रमेश सोनटक्के, अमोल झाडे, विशाल आत्राम, वामन वऱ्हाटे, भारत पाचभाई, अनिल ढोके, देविदास घिवे व इतर कामगार यांची उपस्थिती होती..