लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕अपक्ष नगरसेवकांचा काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश : शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा.
राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर पुर्ण निष्ठा आणि विश्वास व्यक्त करीत गोंडपिपरी नगरपंचायत मधिल प्रभाग क्रमांक १५ च्या अपक्ष उमेदवार शारदा खेमचंद गरपल्लीवार आणि प्रभाग क्रमांक १७ चे सुरेश चिलनकर यांनी आमदार सुभाष धोटे यांचे जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केला. या या दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाने प्रभावी होऊन गोंडपिपरी शहराच्या विकासासाठी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देवून त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला, पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
या दोन्ही अपक्ष नगरसेवकांचे काँग्रेसशी जवळचे नाते असून निवडणूकी पुर्वी काँग्रेसकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती मात्र प्रत्येकाला उमेदवारी देणे शक्य नसल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र त्यांना जनसेवा करण्याची आवड असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून निवडणूक जिंकली. परंतु त्यांची काँग्रेस पक्षाशी कायमच नाळ जुडलेली असल्याने त्यांनी आज काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केला. तर नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांचे पती खेमचंद गरपल्लीवार यांनी सुद्धा काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश केला. गोंडपिपरीत काँग्रेस पक्ष आणि आमदार सुभाष धोटे यांचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही दोघेही पतीपत्नी पुर्ण निष्ठा आणि क्षमतेने काम करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
या दोन्ही अपक्ष नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने गोंडपिपरी नगरपंचायत मध्ये काँग्रेसला आता स्पष्ट बहुमत प्राप्त झाले असून शिवसेनेच्या दोन्ही नगरसेवकांनी सुध्दा काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे गोंडपिपरीत आता काँग्रेसचे ९ आणि शिवसेनेचे २ असे एकुण ११ नगरसेवक झाले आहेत.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, पोडसाचे सरपंच देवीदास सातपुते, तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार यासह गोंडपिपरी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.