By: Shivaji Selokar
औधोगिक नगरी गडचांदूर शहरातील मुख्य मार्गावरील दोन्ही बाजूने सुरु असणाऱ्या निकृष्ठ दर्जाच्या नाली बांधकामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कोरपणा तालुका अध्यक्ष रोहन रमेश काकडे यांनी केली आहे .
मागील काही महिन्यापासून येथील बसस्थानक ते गांधी चौक ,पर्यंतच्या मुख्यमार्गाच्या दोन्ही बाजूनी सिमेंट काँक्रीटच्या करोडो रुपये किमतीच्या नालीचे बांधकाम नगरपरिषद मार्फत सुरु आहे .
सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होतअसून दि.20 जानेवारी रोजी प्रभाग 5 मधील नाली बांधकामाच्या भिंतीचे सेण्ट्रिग काढताच क्षणी भिंतीला भेगा पडून रॉड बाहेर आल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच ,नागरिकांनी नगरपरिषदचे अभियंता यांना बोलवून त्यांच्या निदर्शनास आणून दिली .मात्र सदर नालीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून अत्यन्त निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असून देखील नगरपरिषद मार्फत संबंधित कंत्राटदारावर कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याने, निकृष्ट बांधकाम करून बिले काढण्याचा प्रकार सुरु असल्याचे नागरिकांनकडून बोलल्या जात आहेत .
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
बसस्थानक ते गांधी चौक या मुख्यमार्गावरील होणारे नाली बांधकाम अत्यन्त निकृष्ट दर्जाचे असून ,देखील नगरपरिषद अभियंता ,कर्मचारी, अधिकारी, नगरसेवकयांचा कुठलाही वचक संबंधित कंत्राटदारावर नाही . असे निकृष्ट बांधकाम करण्याऱ्या कंत्राटदारावर नगरपरिषदने कार्यवाही करून नागरिकांना न्याय द्यावा .
,,,रोहन काकडे
अध्यक्ष कोरपना तालुका भाजपा युवा मोर्चा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी विकासकामाची निर्मिती करण्यात येते .मात्र तेच विकास कामे निकृष्ट दर्जाची होऊन नागरिकांना त्रासदायक ठरत असेल तर अशी निकृष्ट बांधकाम करण्याऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी करण्यात येत आहे,