लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕,,,,,,,,,,,,,,,,,,,
*मांजा विक्रीवर प्रतिबंध लावा*
,,,,,,,,,,,,,,,,,,
*⭕वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंडेशनचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन*
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा चिनी नायलॉन मांज्या सर्रास छुप्या पद्धतीने वापरला जात आहे ,त्यामुळे पक्षी प्राण्यासह नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे? शहरात व गल्लीबोळात होत असलेली पतंगबाजी वापरण्यात येणाऱ्या नायलन मांज्या मुळे अनेक घटना उघडकीस आल्या आहे.
वन्यजीव संरक्षणासाठी काम करीत असलेल्या वी कॅन फाउंडेशनच्या माहितीनुसार जिल्ह्यात नायलॉन मांजा मुळे दरवर्षी अनेक पक्षी जखमी होतात. तर काही पक्षांचां जीव नायलन मांजा मुळे जातो, तसेच नायलन मुळे नागरिक देखील जखमी झालेल्या घटना घडल्या आहेत, पक्षाच्या व नागरिकाच्या सुरक्षितेकरिता नायलॉन मांजा वर प्रतिबंध लावावा अशी मागणी वाईल्डलाईफ इन्वारमेंट कन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशन गडचांदूर च्या वतीने मुख्याधिकारी डॉ, विशाखा शेळकी,नगर परिषद गडचांदुर,व पोलीस विभागाला निवेदनातून केली आहे. त्यानूसार सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. व मुख्याधिकारीयांनी मोहीम राबवून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. निवेदन देताना वी कॅन फौंउडेशनचे राकेश गोरे,वैभव राव,सुयोग भोयर, डॉ. लोणगाडगे,प्रितेष मत्ते,दीपक खेकारे,प्रणित अहिरकर,हर्षल ढवळे व इतर सदस्य उपस्थित होते.
वी कॅन फाउंडेशन अनेक वर्षा पासून वन्यजीव संवर्धनाकरिता कार्य करत आहे, नायलॉन मांजामुळे पशुपक्षांच्या जीवाला हानी पोहचत आहे, त्यामुळे प्रशासनाने नायलन
मांज्याच्या विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.