लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार
*⭕काजीपेठ – पूणे गाडी लवकरच आठवड्यातुन 2 दिवस चालणार*
चंद्रपूर – कोरोना संक्रमण काळामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाशांकरीता सोयीच्या असलेल्या सर्व रेल्वे गाड्या मार्च 2020 पासून बंद करण्यात आल्या होत्या त्या सुरू न झाल्याने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी प्रवाशांना होत असलेल्या असुविधेची दखल घेत या सर्व महत्वपूर्ण गाड्या सुरू करण्याकरीता केंद्रीय रेल्वे मंत्राी, रेल्वे राज्यमंत्री , रेल्व बोर्डाचे अध्यक्ष, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक, मंडल रेल प्रबंधक यांचेशी सातत्याने भेटी, दुरध्वनी चर्चा तसेच पत्रांव्दारे पाठपुरावा केल्याने त्यांच्या यशस्वी प्रयत्नातून वर्धा – बल्लारशाह पॅसेंजर (मेमुरॅक) व्दारे येत्या दि. 14 जानेवारीपासून सुरू होत आहे.
काजीपेठ-पूणे ही गाडी सध्या आठवड्यातुन एकदिवस सुरू आहे. तीसुध्दा लवकरच एलएचबी नव्या कोचेससह आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील रेल्वे यात्राी विशेषतः पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अहिरांच्या प्रयत्नामुळे फार मोठी पर्वणी लाभणार आहे. हंसराज अहीर यांनी यापूर्वी जिल्ह्यातील प्रवाशांकरीता ज्या गाड्या, पॅसेंजर सुरू होत्या त्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात अशी आग्रही भूमिका केंद्रीय रेल्वे मंत्राी अश्वीनी वैष्णव व राज्यमंत्राी रावसाहेब दानवे यांचेकडे सातत्याने मांडल्याने या गाड्याही सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड अनुकुल असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
दि. 11 जानेवारी 2022 रोजी मध्य रेल्वेव्दारा जिल्ह्यातील झेडआरयुसीसी सदस्यांच्या आभासी बैठकीस संबोधीत करतांना रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी बल्लारशाह – मुंबई नवी गाडी एप्रिल 22 पर्यंत वालविण्यात येईल व ही गाडी आठवड्यातुन तीन दिवस सुरू राहील असे आश्वासन दिले. काजीपेठ – मुंबई (आनंदवन एक्स्प्रेस) वाया भुसावळ, ताडोबा एक्सप्रेस वाया नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेस वाया वणी बल्लारशा पर्यंत विस्तार करण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले आहे परंतू बल्लारशाह पीटलाईन चे काम 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार असल्याने त्यानंतरच उपरोक्त गाड्या सुरू होतील असे सांगीतले.
चंद्रपूर ते हावडा थेट रेल्वे ही सुध्दा चंद्रपूर स्टेशन ते चांदा फोर्टशी जोडणाऱ्या तीसऱ्या लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतरच सुरू होणार आहे. चंद्रपूर स्टेशनवर 4 लिफ्ट चे काम सुरू झाले असून 2 लिफ्ट मार्च अखेर तर अन्य 2 लिफ्ट डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. याबरोबरच सेवाग्राम एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांचा थांबा सेवाग्राम स्टेशनवर देण्याकरीता लवकरच कारवाई होणार असल्याने या सर्व रेल्वे सुविधांसाठी तसेच बल्लारशाह येथे पीटलाईनची निर्मिती करवून घेण्यात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे मोलाचे योगदान असल्याचे झेआरयुसीसी सदस्य दामोदर मंत्री , चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी यांनी म्हटले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी हंसराज अहीर यांच्या माध्यमातून यापुढेही प्रयत्न करून प्रवाशांना न्याय मिळवून देण्याची भूमिका चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीव्दारे व्यक्त करण्यात आली आहे.