लोकदर्शन 👉 महादेव गिरी
वालुर/प्रतिनिधी
वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उतसाहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. डि.भोकरे व प्रमुख पाहुणे प्रविण क्षीरसागर, बि.व्हि .बुधवंत, एम.एस.गिरी, सौ.जि.आर.मळी, एस.ए.महाडिक, डि.आर. नाईकनवरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे, प्रविण क्षीरसागर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात करून वंदन करण्यात आले. यावेळी बि.व्हि.बुधवंत, प्रविण क्षीरसागर ,एम. एस. गिरी, एस. ए.महाडिक, सौ.जि.आर.मळी, जि.एम.कावळे आदिंनी आदिंनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप
मुख्याध्यापक एस. डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठि बि.व्हि.बोंडे, जि.एम. कावळे, उमाकांत क्षीरसागर, कैलास क्षीरसागर आदिनी परीश्रम घेतले.