लोकदर्शन 👉
⭕स्वतःच्या मुलांच्या भविष्याची चिंता पालकांना आहे की नाही….
*50% क्षमतेने सिनेमा थिएटर आणि बार सुरू आहेत. बाहेर खेळायला आणि सिनेमा पाहायला मुलं गेले तरी चालतात, आणि शिक्षण मात्र थांबले आहे. मागील दोन वर्षे झाले शिक्षण थांबले आहे. पालक वर्ग या विरुद्ध आवाज का उठवत नाही.*
दोन वर्षांची ही पोकळी भरून निघेल का. आणि खरंच कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे मग आजीवन मुलांचे शिक्षण बंद चालूच करणार का…..
*पालकांनो लक्षात ठेवा जीव महत्वाचा आहे, आणि कदाचित मुलांना घरी बसवून आपण मुलांचा जीव वाचविण्यात कदाचित यशस्वी व्हालही, पण आपल्या पाल्याचे शिक्षण असेच बंद चालू राहले तर आपल्या पाल्याची बुद्धी विकसित न झाल्याने तो बुद्धीने अपंग झालेला आपल्याला चालेल का?*
विचार करा.. सर्वात मोठी संपत्ती ही मुलांची शैक्षणिक संपत्ती आहे, आणि शिक्षणच बंद पडले तर येणाऱ्या पिढ्या आणि देश बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा…
*लक्षात ठेवा जोपर्यंत पालक वर्ग डिमांड करणार नाही तोपर्यंत सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रति जागृत होणार नाही आहे. हक्क मागाल तरच मिळेल. स्वतःच्या मुलांसाठी जिथे पालकच जागृत नाही तिथे सरकार कसे जागे होणार, त्यामुळे आता पालकांनी एकत्र येऊन आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याकरिता योग्य निर्णय घेऊन लढा देणे आवश्यक झले आहे…..*
त्यामुळे पालकांनी आता मन कठोर करून मुलांना शाळेत पाठवायलाच हवे जेणेकरून मुलांच्या भविष्याला कीड लागणार नाही. *शिक्षण न घेतल्याने बुद्धीने अपंग झालेली पिढी 100 वर्ष जरी जगली तर ती पालकांच्या मनाला आनंद देणारी नक्कीच नसेल हे मात्र नक्की त्यामुळे पालकांनी आवर्जून विचार करावा…..*