आमदाराकडून नांदा येथील नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती


  • ⭕बांधकाम व आरोग्य विभागाच्या प्रमुखांशी चर्चा

कोरपना – कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. पुढील पाठपुरावा करून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी बांधकाम व आरोग्य अधिकाऱ्यांसह रुग्णालयाची नुकतीच आमदार सुभाष धोटे यांनी पाहणी केली.
आमदार सुभाष धोटे यांनी २००९ ते २०१४ या आमदारकीच्या काळात राजुरा विधानसभा क्षेत्रात चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी प्राप्त करून दिली होती. त्यामध्ये गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी, राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन, जिवती तालुक्यातील शेणगाव व कोरपना तालुक्यातील नांदाफाटा या चार गावांचा समावेश होता. सर्वच ठिकाणची बांधकामाची कामे अंतिम टप्प्यात आहे. नांदाफाटा परिसर हा औद्योगिक क्षेत्र असल्याने व नारंडा आणि गडचांदूर हे दोन्ही ग्रामीण रुग्णालये जास्त अंतरावर असल्याने येथील नागरिकांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मोठा लाभ होणार आहे. त्यासाठी आरोग्य साहित्य, आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती, विविध आरोग्य यंत्र अशा गोष्टींची या प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यकता पडणार असल्याने लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे. परिसरातील अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्याची संकल्पना असल्याचे आमदार सुभाष धोटे यांनी बोलताना स्पष्ट केले.
याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून प्राथमिक आरोग्य केंद्र कसे लवकर सुरू होतील यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे म्हटले. यावेळी कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, बांधकाम विभागाचे अभियंता गेडाम, नारंडा येथील, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, बिबी उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदनखेडे, श्यामसुंदर राऊत, माजी सभापती साईनाथ कुळमेथे, आशिष देरकर, अभय मुनोत पुरुषोत्तम निब्रड, उमेश राजूरकर, शैलेश लोखंडे, माजी सरपंच घागरू कोटनाके, आनंद पावडे, बापूजी पिंपळकर, निवृत्ती ढवस, हारून सिद्दिकी, शामकांत पिंपळकर, सुरेश राऊत, नथु तलांडे, हेमंत भोयर, किशोर चौधरी, सतीश जमदाडे, महेश राऊत, कल्पतरू कन्नाके, दिलीप थेटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *