लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- ०४/०१/२०२१ :-* सोलापूर व संपूर्ण राज्यात शासनमान्य ताडी (शिंदी ) दुकाने चालु करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे . सदर निर्णयामुळे गरीब कामगार कुटुंबियांवर मरण्याचे सावट उभे राहिले आहे. म्हणजेच या ताडी मुळे अनेक गरीब कामगार वर्ग मृत्यु मुखी पडणार आहे. म्हणून सदर दुकाने चालू करू नये . यासाठी महाराष्ट्र कामगार सेना व ताडी दुकाने विरोधी संघर्ष समितीने पालकमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस श्री विष्णु कामरपुरी (महाराज) यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्र प्रशासन विभागाने २०१८ साली बंद पडलेले ताडी दुकाने चालु निर्णय घेतला . हा निर्णय शासनाचे पदाधिकारी म्हणजेच मंत्री मंडळाला दिशाभूल करून घेतल्याचे दिसून येते . म्हणून या विरोधात महाराष्ट्रात कामगार सेनेच्या वतीने आंदोलन पुकारले आहे . त्या आंदोलनांनी मा . जिल्हाधीकारी मा . उत्पादन शुल्क अधिक्षक , मा . आमदार गुलाबराव पाटील साहेब , हसन मुश्रीफ साहेब व २८८ आमदारांना निवेदने देण्यात तसेच यासंदर्भी विविध सामाजिक संघटना सार्वजनिक मंडळे आणि नागरीक ताडी दुकाना विरुध्द आंदोलन करीत आहे . त्याच बरोबर सोलापूर चे महापौर श्री सौ . कांचना यन्नम , खासदार सिध्देश्वर महाराज माजी पालकमंत्री व ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख (मालक) यांचे शिष्ठ मंडळ जिल्हाधीकार्यांना भेटून शासन मान्य ताडी दुकानांना विरोध केला आहे .
तरीही प्रशासन व उत्पादन शुल्क कुठलीही कार्यवाही कारायला तयार नाही म्हणुन मा सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री श्री दत्ता ( मामा ) भरणे यांच्या सोलापूर दौऱ्याचे वेळी निवेदन देण्यात येणार आहे तरी ताडी विरोधी सर्व संघटना , सर्व पक्ष व नागरी बंधु भगिनिंनी उपस्थीत रहावे अशी विनंती विष्णू कारमपुरी ( महाराज ) सोहेल शेख , गणेश बोड्डु , प्रसाद जगताप यांनी केला आहे .