लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
अनंतराव क्किलनफुएल इंडिया प्राय लिमिटेड राजुरा, बळीवंश बायोफुएल प्राय लिमिटेड कोरपणा, तीर्थरूप बायोफुएल प्राय लिमिटेड बल्हारशाह, क्रुषीधारा बायोफुएल प्राय लिमिटेड पोंभुर्णा या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने स्व. भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा गडचांदुर येथे 4 जानेवारी ला मीरा क्किलनफुएल लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत जुळलेल्या प्रत्येक तालुक्यातील ग्रामउदयोजकांच्या सामंजस्य कराराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री वामनराव चटप (माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र)होते,विशेष अतिथी म्हणून श्री संजय धोटे (माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र,) श्री अरुणभाऊ धोटे (नगराध्यक्ष राजुरा नगरपरिषद) होते,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन श्री डमाळे कृषी अधिकारी कोरपणा, श्री मटपल्ले कृषी अधिकारी राजुरा, श्री चव्हाण कृषी अधिकारी बल्लारपूर , श्री निमोड कृषी अधिकारी पोंभुर्णा, पवार उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा, मा. सौ सविताताई टेकाम नगराध्यक्षा नगरपरिषद गडचांदुर , तसेच मा. श्री अरुणभाऊ निमजे माजी सभापती जि. प.चंद्रपूर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री विश्वास देशमुख ( Prime BDA MCL), श्री संजय पिंपळकर ( Sr BDA MCL) ,
श्री संजय शेळके (Sr BDA MCL) , श्री हरीष राजूरकर ( BDA MCL) यांची उपस्थिती लाभली.
सोबतच कार्यक्रमाला प्रमुख विषेश अतिथी म्हणून मुल तालुक्याचे MPO Owner श्री शेखर श्रीवास्तव , हिंघनघाट तालुक्याचे MPO Owner श्री राईकवार , गलांडे , राडे , भद्रावती तालुक्याचे MPO Owner श्री फुलझेले
पोंभुर्णा तालुक्याचे MPO Owner श्री पिंपळशेंडे , सिंदेवाही तालुक्याचे MPO Owner श्री मा़ंडवकर , चिमुर तालुक्याचे MPO Owner श्री बहाते समुद्रपुर तालुक्याचे MPO Owner श्री थुल , देवळी तालुक्याचे MPO Owner श्री कांबळे , गोंडपिपरी तालुक्याचे MPO Owner श्री कोमल्ला गडचिरोली तालुक्याचे MPO Owner श्री हजारे सावली तालुक्याचे MPO Owner श्री गेडाम यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन अनंतराव क्किलनफुएल इंडिया प्राय लिमिटेडचे संचालक श्री प्रशांत चटप ,श्री नागेश चटप, बळीवंश बायोफुएल प्राय लिमिटेड चे श्री विलास कुडे , श्री अक्षय कुडे , श्री मोहनीश कुडे, तीर्थरूप बायोफुएल प्राय लिमिटेड चे श्री डॉ यशवंत कन्नमवार , श्री मोहित कन्नमवार, कृषीधारा बायोफुएल प्राय लिमिटेड चे संचालक श्री मुकेश पिंपळशेंडे , श्री लुतेश उपरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंतराव क्किलनफुएल इंडिया प्राय लिमिटेड कंपनीचे संचालक श्री प्रशांत चटप यांनी केली. त्यांनी MCL कंपनीचे व्हिजन 2030 पर्यंत भारताला इंधनात स्वयंपूर्ण करणे असे सांगितले. MCL कंपनीचे रचनाकार शिल्पकार डॉ शाम घोलप , श्री लवेश जाधव श्री प्राची ढोले ,शेलार व संपूर्ण MCL टीम इंधन क्रांतिचे उदिष्ट साध्य करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे सांगितले.
देशमुख यांनी MCL कंपनीच्या माध्यमातून संपुर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होणार आहे, सोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती कशी होणार, पर्यावरण संतुलन कसे राखले जाणार, सोबतच महिला सक्षमीकरण (Women’s Empowerment) कसे होणार हे सविस्तर सांगितले.
श्री पिंपळकर यांनी कंपनीच्या माध्यमातून केवळ आथिर्कच नव्हे तर संपूर्ण सामाजिक, व वैचारिक विकास कसा होणार आहे हे सांगितले. भारत हा क्रुषिप्रधान देश तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असा देश असल्यामुळे सर्वात जास्त परकीय आक्रमण भारतावर झालेत याची जाणीव सर्वांना करून दिली.माजी सभापती अरुणभाऊ निमजे म्हणाले की MCL कंपनीच्या माध्यमातून अनेक बेरोजगार हातांना काम मिळणार असल्याने त्यांनी हा विधायक उपक्रम असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना वामनराव चटप म्हणाले की विदर्भात शेतकरी बांधवाच्या आत्महत्या सर्वात जास्त आहे आणि हे बदलायचे असतील तर पारंपरिक पिक पद्धती बदलने आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. MCL कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक गावातच हत्ती गवताच्या लागवडीतून शेतकरी बांधवांच्या आथिर्क उत्पन्नात वाढ होणार असल्याने पैशाचे चलनवलन होउन इतर व्यवसाय भरभराटीस येणार आहे. सोबतच इंधन नापोटि भारत देशाला कोट्यवधी डॉ लर खर्च करावा लागतोय त्याची बचत होईल असे त्यांनी सांगितले. आभार प्रदर्शन श्री विलास कुडे यांनी केले.