लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕*समाजात स्वताच्या मेहनतीतून स्थान निर्माण करणाऱ्या भगिनींचा सत्कार*
सोमवार 3 जानेवारी रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच समाजात स्वताच्या मेहनतीतून स्थान निर्माण करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना देवराव भोंगळे म्हणाले की सावित्रीबाई स्त्री क्रांतीच्या खरा प्रज्ञाचा होत. भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, भारतीय समाज सुधारक, शिक्षण तज्ञ तसेच कवियत्री असलेल्या सावित्रीबाई फुले ह्या भारतीय स्त्रीवादाची जननी आहेत. भारतातील महिलांच्या हक्क मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली. महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीतील त्यांचे स्थान अद्वितीय आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरणताई बोढे, भाजपाचे अमोल थेरे, अजय आमटे, बबलू सातपुते, दिलीप कांबळे, शारदा झाडे, सुनंदा लिहीतकर, उपस्थित होते.