रामपूर, धोपटाळा, गोवरी येथे विकास कामांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करा.

By : Mohan Bharti

आमदार सुभाष धोटे यांच्या वेकोलीच्या मुख्य महाप्रबंधक डे यांना सुचना.

राजुरा  :– वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या क्षेत्रीय कार्यालय, धोपटाळा टाऊनशीप येथे आज आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक डे यांना रामपूर, धोपटाळा, गोवरी, पवनी, सास्ती व परिसरातील ग्रामीण भागात मुलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध विकास कामाकरिता सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सुचना दिल्या. यात भवानी माता देवस्थान रामपूर येथे संरक्षण भितीचे बांधकाम, स्थानिक परिसरातील पांदन रस्त्याची कामे, प्रकल्पग्रस्तांच्या विविध अडचणी सोडविणे, परिसरातील रस्त्यावरील धुळ प्रदुषण नियंत्रणासाठी रस्त्यावर पाणी मारणे यासोबतच वेकोली द्वारा निर्मित अन्य समस्या सोडवण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. मुख्य महाप्रबंधक डे यांनी वरील सर्व सुचना लक्षात घेऊन तातडीने उपाय योजना करण्यात येईल असे आश्वासन आमदार सुभाष धोटे यांना दिले आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, काँग्रेसचे संपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, कामगार नेते शंकर दास, बंडू कावळे, हेमंत झाडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, प्रतिक कावळे, सुजित कावळे आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here