जेई लस म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल !

लोकदर्शन 👉 मोहन भारती
●डॉ. मंगेश गुलवाडे : जापनीज एन्सेफेलाइटिस प्रतिबंधात्मक लसीच्या जनजागृती पालकसभा

 

चंद्रपूर, ता. ३१ : जापनीज एन्सेफेलायटिस आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल होय. पालकांनी मनात कोणतीही शंका तीन जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत १ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करू घ्यावे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.

जापनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीच्या जनजागृतीसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त वतीने
शहरातील शाळांमध्ये पालकसभा घेण्यात आली. एमबी मॉडेल स्कुल कृष्णनगर व भगिनी निवेदिता स्कुल कृष्णनगर येथे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच जय लेहरी स्कुल संजयनगर येथे डॉ. प्रीती चौहान, अमरवीर भगतसिंग स्कुल इंदिरानगर आणि ट्रिनिटी कॉन्व्हेंट इंदिरानगर येथे डॉ. पियुष यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, डॉ. अनुप पालीवाल यांनी जापनीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण यासंदर्भात माहिती दिली.

या लसीकरण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरात पहिल्या आठवड्यात शाळेत, अंगणवाडी, मदरशामध्ये जाणाऱ्या मुलांचे लसीकरण, पुढील दोन आठवड्यात शाळेत न जाणाऱ्या मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. ही लस मोफत असून, खासगी रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे मनात शंका न ठेवता लस घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *