लोकदर्शन 👉 मोहन भारती
*⭕ताड़ी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णु कारमपुरी (महाराज) यांचे राज्यातील सर्व आमदारांना निवेदने*
*सोलापूर दिनांक :- २९/१२/२०२१ :-* सोलापूर जिल्ह्यात शासनमान्य ताडी विक्रीच्या नावाखाली जनतेला विषारी शिंदी देण्याचा घाट जिल्हा प्रशासन आणि ताडी व्यवसायातील माफियांच्या अभद्र युतीतून घातला जातोय. शासन सोलापुरात पुन्ह:श्च ताडी विक्रीची परवाने देण्याच्या प्रयत्नात असून केवळ कागदोपत्री शिंदीच्या झाडांची आकडेवारी दाखवून नागरिकांना विषारी शिंदी पाजून त्यांना यमसदनी पाठविण्याची तयारीत असल्याचं दिसतंय.
सोलापूर शहर-जिल्ह्यात कालपर्यंत ताडीच्या नावाखाली ताडी विक्री व्यवसायातील माफियांनी क्लोरल हायड्रेटपासून निर्मित शिंदी दिल्याचं पोलिसी कारवाईत अनेक वेळा उघड झालंय. ती बनावट शिंदी घेणारा वर्ग बहुतांशी कष्टकरी, कामगार आणि मजूर वर्गातील असल्यानं शेकडो कष्टकरी सामान्य नागरिक त्या रसायनयुक्त शिंदीचे बळी ठरल्याचं वेळोवेळी पुढे आलं. त्यानंतर २०१८ पासून सोलापूर जिल्ह्यात अनेक समाजसेवी संघटनांच्या आंदोलनानंतर शिंदीखाने बंद करण्यात आले होते.
‘मौत का कुवाँ’ अशी ओळख असलेले रासायनिक शिंदीचे ताडीखाने सोलापूर शहर-जिल्ह्यात पुनश्च सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ कागदोपत्री शिंदीच्या झाडांची आकडेवारी देऊन ४२ शिंदीखाने उघडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामागे त्या अवैध व्यवसायातील आंतरराज्य टोळी सक्रिय आहे. त्यांच्याशी अभद्र युती करून हा उद्योग सुरू असून त्यास कडाडून विरोध दर्शविण्यासाठी कामगार सेनेचे सरचिटणीस तथा शासनमान्य ताड़ी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मुंबईस रवाना झाले होते.
या शिष्टमंडळातील सोहेल शेख, गणेश बोड्डू, प्रसाद जगताप, विठ्ठल कुऱ्हाडकर आदींनी अधिवेशनस्थळी, २७ आणि २८डिसेंबर राज्यातील २८८ लोकप्रतिनिधी, राज्यातील मंत्रीमहोदयांच्या ही गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यासाठी निवेदने देऊन या काळ्या कर्तुत्वाचा पर्दाफाश करण्यासाठी त्याचबरोबर त्यास कडाडून विरोध दर्शविण्यासाठी निवेदने देण्यात आल्याचं महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्री. विष्णु कारमपूरी (महाराज) यांनी म्हटले
===============================
*फोटो मॅटर :- महाराष्ट्र ताडी दुकाने विरोधात महाराष्ट्र कामगार सेना व ताडी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समीतीच्या वतीने मुंबईत २८८ आमदारांना निवेदन देण्यात आले. त्यापैकी मा. ना. श्री गुलाबराव पाटील, स्वछत्ता व पाणीपुरवठा मंत्री, मा ना. श्री हसन मुश्रीफ कामगार मंत्री यांना निवेदन देतांना श्री. विष्णु कारमपुरी (महाराज) साहेल शेख, गणेश बोड्डू, प्रसाद जगताप, विठ्ठल कुऱ्हाडकर, रमेश जाधव ,सचिन चव्हाण आदी दिसत आहेत.*