लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ग्रामगीताचार्य मारुती सातपुते आणि ह ब प बनसोड यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई हे होते तर विशेष अतिथी ग्रामगीताचार्य मारोती सातपुते, प्रमुख पाहुणे ह भ प बनसोड महाराज, उपसरपंच कौशल्या मनोहर कावडे, तमुस अध्यक्ष महादेव पाटील ताजने, ग्रा प सदस्य सुनिता ऋषी उमाटे, रंजना दिवाकर पिंगे आदि उपस्थिती होते. या प्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गावातील युवकांनी पेटून उठले पाहिजे त्यांच्या विचाराचा वसा गावामध्ये रुजवून गाव स्वच्छ, सुंदर व गावातील लोकांचे विचार निर्मळ करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे गावामध्ये जुन्या अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी भूमिका सरपंच नंदकिशोर वाढई यांनी मांडली. ग्रामगीताचार्य मारुती सातपुते यांनी गावातील युवकांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून स्वतःपासून, घरापासून व गावापासून व्यसनमुक्तीची सुरुवात केली पाहिजे असे आवाहन केले.
या प्रसंगी तुकडोजी महाराजांचे जेष्ठ अनुयायी पुंडलिक पाटील पिंगे, दत्ता पाटील पिपळशेंडे, महादेव पाटील पिंगे, महादेवराव आंबीलकर, सुधाकरराव पिपळशेंडे, विठ्ठल वाढई, कवडु पाटील पिंगे, नानाजी पा आबिलकर, देवाजी पा चापले, राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा मिनाताई भोयर, मनिषा धनकट व गावातील समस्त गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.