लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- २६/१२/२०२१ :-* महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाचे महाराष्ट्रात ताडी (शिंदी) दुकाने प्रशासन विभागाने जारी केले आहे शासन मान्य ताडी (शिदी) दूकाने म्हणजे मौतका कूवा आहे . म्हणून ताडी ( शिंदी ) दूकाना विरुध्द महाराष्ट्र कामगार सेना व शासन मान्य ताडी ( शिंदी ) दुकान विरोधी संघर्ष समीतीच्या वतीने दि २७/२८ डिसेंबर २०२१ रोजी विधान सभेचे २८८ आमदारांना निवेदन देण्यासाठी कामगार सेनेचे शिष्टमंडळ मुंबईस रवाना झाले असल्याचे माहीती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस व शासन मान्य ताड़ी ( शिंदी ) दूकाने विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णु कारमपूरी ( महाराज ) यांनी दिली आहे .
सोलापूर सह महाराष्ट्रात ताडी ( शिंदी) कुठल्याही प्रकारचे मागणी नसताना केवळ आर्थिक लाभासाठी व काही दोन नंबर धंदेवाल्यांच्या हितासाठी बंद पडलेले ताडी ( शिंदी ) दूकाने शासनाला अंधारात ठेवून प्रशासन ताडी ( शिंदी ) चालू करण्याच्या निर्णय घेतला आहे . याविरुध्द कामगार सेना व संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे . त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून दि २७ डिसेंबर २०२१ रोजी विधानसभेच्या २८८ आमदारांना निवेदन देण्यासाठी उद्या दि २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७ वा *विष्णु कारमपूरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली सोहेल शेख , गणेश बोड्डू . व प्रसाद जगताप व विठ्ठल कुऱ्हाडकर आदि सह पद्मशाली चौक (कामगार सेना कार्यालय)* येथून मुंबई रवाना झाले आहे.
===========================
*फोटो मॅटर :- शासन मान्य ताडी (शिंदी) विरोधात २८८ आमदारांना निवेदन देण्यासाठी कामगार सेनेचे शिष्टमंडळ मुंबईस रवाना होतांना विष्णु कारमपूरी ( महाराज ) यांच्या नेतृत्वाखाली सोहेल शेख , गणेश बोड्डू . व प्रसाद जगताप व विठ्ठल कुऱ्हाडकर आदि सह कामगार बंधू – भगिनी दिसत आहे.*