लोकदर्शन 👉
चंद्रसपूर। ÷ प्रा. योगेश दुधपचारे यांची
फेसबुक पोस्ट
मागील वीस दिवसात सोशल मीडियाच्या मदतीने चंद्रपूरमधील प्रदूषणाची पातळी अभ्यासण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रपूर मधील हृदय तज्ञ डॉ. अशोक वासलवार सर आणि श्वसनमार्ग तज्ञ डॉ. सौरभ राजूरकर यांच्या मदतीने हा अभ्यास पूर्ण करता आला. या अभ्यासातील निष्कर्ष अतिशय गंभीर आणि वार्निंग देणारे आहेत. चंद्रपूर मधील साधारणत 68 टक्के लोकं कुठल्या ना कुठल्या पर्यावरणीय आजाराशी झगडत आहेत. तीन टक्के लोकांचा या आजारामुळे मृत्यू झालेला आहे.
94.2 टक्के लोक चंद्रपूर मधील हवा अत्यंत प्रदूषित आणि आरोग्याला अपायकारक झालेली आहे असे म्हणतात, माझी बिघडलेली प्रकृती येथील हवेशी जुडलेली आहे असे 75.5 टक्के लोक म्हणतात, 66 टक्के लोकांच्या घरी कुणी ना कुणी त्वचा रोगाशी झगडतो आहे, 63 टक्के लोकं सर्दी वारंवार शिंका येणे नाकातून पातळ द्रव्य वाहणे नाकात खाऊ अशा आजारांशी झगडत आहेत. 57 टक्के लोकांच्या घरी कोरडा खोकला, कोरडा खोकला, गळ्यात किंवा घशात खाजवणे, बाळकफ, निमोनिया, सीओपीडी, क्रॉनिक ब्राँकायटिस, ठसे पडणे, दमा, घशात कफ जमा होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, घशातून आवाज येणे, छोट्या मुलांतील अॅक्युट लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन, लंग फायब्रोसिस अशा आजारांची लढत आहेत.
चंद्रपूरचा मनुष्य आजारांसोबत सोबत ॲडजस्ट करीत आहे. रोजगार, नोकरी, दुकान, व्यवसाय या नावाखाली अत्यंत प्रदूषित हवा घेण्यासाठी इथला माणूस लाचार आहे. परंतु ही स्थिती आपण सर्व मिळून बदलूया, एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 35 टक्के भागात चंद्रपुरात जंगल आहे, जगातील सर्वात मोठा वाघांच्या जिल्हा चंद्रपूर आहे, आपण सर्वांनी फक्त मिळून प्रयत्न करायला हवेत, स्थिती बदलेल..