लोकदर्शन 👉 मोहन भरयी
गडचांदूर ÷ दि ,२३/१२/२०२१ येथील सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांच्या मार्गदर्शनात थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती २२ डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी गणित या विषयावर आधारित विविध स्पर्धा विद्यार्थ्यांनं करिता आयोजित करण्यात आल्या यात गणितीय प्रश्नमंजुषा, गणितीय रांगोळी, भिंतीचित्र स्पर्धा ;घेण्यात आल्या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गणित शिक्षिका माधुरी उमरे भूवनेश्वरी गोपंमवार,सुरेश पाटील, नामदेव बावनकर ,जी. एन. बोबडे, राजेश मांढरे उपस्थित होते, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गाडगे यांनी मानवी जीवनातील दैनंदिन व्यवहारात गणिताचे महत्त्व काय? हे समजून सांगितले तर माधुरी उमरे यांनी रामानुजम यांच्या जीवन कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांनी गणित विषयाची भीती ठेवू नये असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन महेंद्र कुमार ताकसांडे यांनी तर आभार प्रदर्शन भालचंद्र कोगंरे यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक,शिक्षिका ,विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.