By : Mohan Bharti
गडचांदूर : महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कला विभागाचे प्रमुख प्रा, प्रफुल्ल माहुरे होते,प्रमुख पाहुणे म्हणून एम, सी व्ही, सी, विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, प्रा, आशिष देरकर, प्रा, नंदाताई भोयर,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा, प्रदीप परसुटकर होते. याप्रसंगी प्रा, नंदा भोयर यांनी अल्पसंख्याक विभागाचे वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ची माहिती दिली. प्रा, आशीष देरकर यांनी आपल्या भाषणात अल्पसंख्याक समाजाला भारतात कुठेही राहण्याचा मुलभूत अधिकार भारतीय संविधान ने दिला आहे,त्यामुळे अल्पसंख्याक समाज आज काही प्रमाणात प्रगतीपथावर असल्याचे सांगितले, यावेळी अल्पसंख्याक चे अधिकार, हक्क, यासंदर्भात माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमा चे संचालन व आभार प्रदर्शन प्रा, आशीष देरकर यांनी केले, कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.