लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕लता डकरे १४ मतांनी विजयी.
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये ठराविक मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकल्याने शिवसेनेचे एक सदस्य अपात्र ठरल्याने त्या जागेसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली. ग्रामपंचायतचा फक्त १५ महिणे शिल्लक असल्यामुळे निवडणूक होऊ नये म्हणून स्थानिक सर्वपक्षीय नेते प्रयत्नरत होते पण काही हौशी नेत्यांनी गावाची एकता खंडीत करून निवडणूक घेण्यावर अधिक भर दिला. परंतु काँग्रेसने आपला शब्द पाडत नैतिकतेच्या आधारावर शिवसेनेला समर्थन करून दिलदारपणाचा परिचय करून दिला. अखेर येथे शिवसेना उमेदवार लता डकरे यांनी त्यांच्या विरोधात उभे असलेल्या सुनील नळे यांचा १४ मतांनी पराभव करून येथील हौशी कार्यकर्त्यांना वास्तविकता दाखवून दिली आहे. निवडणूकीच्या काही दिवस अगोदर येथील हौशी कार्यकर्ते विजय आपलाच होणार आम्ही सत्तेत आहोत अशा वल्गना करून अविरोध निवड न करता निवडणूक घेण्याची वेळ आनली आता निवडणूकीत पराभव झाल्याने या हौशींचे चांगलेच हसे झाले आहे.
लता डकरे यांच्या या विजयाबद्दल रामपूर येथे शिवसेना – काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि रॅली काढून जल्लोष साजरा केला. या प्रसंगी रामपूर शिवसेनेचे रमेश कुडे, अजय सकिनाला, रमेश झाडे, अतुल खनके, रवी बतुला, बंटी मालेकर, विधाते जी, नितीन ढवस, उत्तम गीरी, काँग्रेसचे प्रभाकर बघेल, रत्नाकर गर्गेलवार, जगदीश बुटले, कोमल पुसाटे, अशोक मुन, विजय कुडे, विजय कानकाटे, क्रिष्णा खंडाळे, उईके ताई, मुन ताई गजभिये ताई, अविनाश सावरकर, प्रवीण बोबडे, एकनाथ खडसे यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.