लोकदर्शन👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- २०/१२/२०२१ :-* सोलापूर शहर व जिल्ह्यात ताडी (शिंदी) दुकानांना परवानगी देणे म्हणजे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार म्हणजे *(महाविकास आघाडी)* सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मा.जिल्हाधिकाऱ्यांनी शहर व जिल्ह्यातील शासन मान्य ताडी (शिंदी) दुकाने चालू करण्यास परवानगी देऊ नका. अन्यथा शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना, प्रहार संघटना व ताडी (शिंदी) दुकान विरोधी संघर्ष समितीच्या वतीने *जहाल* आंदोलन करण्यात येईल.म्हणजेच गाठ आमच्याशी आहे असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस :- विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी एका निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शासन मान्य ताडी (शिंदी) दुकानाविरोधात मा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाने सोलापूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातही सरकारमान्य ताडी ( शिंदी ) दुकाने चालू करण्याचे अध्यादेश काढले असल्याचे समजते . त्यानुसार सोलापूर शहर व जिल्हयासाठी काही दुकानांचा सहभाग आहे . परंतु सोलापूर शहर व जिल्हयात ताड़ी ( शिंदी ) दुकाने सुरु करण्यासाठी सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी या नात्याने म्हणजेच आपल्या परवानगी आपली परवानगी असणे बंधनकारक आहे . शिवाय सोलापूर शहर व जिल्हयात कोणतीही ताडी ( शिंदी ) दुकाने सुरु करु शकत नाहीत .
मा. जिल्हाधिकारी साहेब आपणांस विनंती की, सोलापूर हे गरीब, कष्टकरी, शेतमजूर, असंघटीत व विडी व यंत्रमाग कामगारांचे शहर आहे. शासन मान्य ताडी (शिंदी) दुकाने गेल्या चार वर्षापूर्वी अनेक वर्षापासून अस्तीत्वात होते. परंतु सदर शासनमान्य ताडी (शिंदी) दुकानात नैसर्गिक झाडाचे ताडी (शिंदी) विकले जात नव्हते. केमिकल युक्त, विषारी अलकोल मिश्रीत ताडी (शिंदी) विकले जात असे. त्यामुळे गरीब कामगार वर्ग हजारोंच्या संख्येने मरण पावले. त्यामुळे हजारो कुटूंब उध्दवस्त झाले . इतकेच नव्हे तर युवक वर्ग यात मोठया प्रमाणात बळी गेले . एकतर आपल्या जिल्हयात अजिबात ताडी (शिंदी) झाडे नाहीत . दुकानाच्या प्रस्ताव दाखल करतांना बोगस नावे नोंदवून दुकानाची मागणी करण्यात आली आणि ताडी ( शिंदी ) चे एकही झाड नसतांना झाडे असल्याचे ७/१२ उतान्यावर बोगस नोंदी करण्यात आले . असे अनेक प्रकारचे चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक करून दुकानांना परवानगी मिळविले . यात सोलापूर जिल्हा उत्पादन शुल्क खात्यांचे हितसंबंध होते . हे प्रकरण सर्व उघडकीस आल्यावर व सोलापूर सर्व राजकीय पक्ष , सामाजिक संघटना , कामगार संघटना , नगरसेवक , आमदार , खासदार असे लोकप्रतिनिधी सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरीक ह्या सर्वांचा विरोध झाल्यावर महाराष्ट्र शासन सन २०१८ साली शासन मान्य ताडी ( शिंदी ) दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून किमान चार वर्ष झाले शासनमान्य ताडी ( शिंदी ) दुकाने बंदच आहेत .
असे असतांना अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाने शासन मान्य ताडी ( शिंदी ) दुकाने चालू करण्यासाठी मा . श्री . रमानाथ झा यांच्या नेतृत्वाखालील समितीने पामवाईन नावाखाली परत एकदा विषारी ताडी ( शिंदी ) दुकाने उघडण्याचा प्रयत्न करीत आहेत हे अत्यंत दुर्दैव आहे . कारण ताडी ( शिंदी ) दुकाने चालू करण्याची कोणाची मागणीच नाही . असे असतांना प्रशासनाचा इतका हद का ? शासनमान्य ताडी ( शिंदी ) दुकाने चालू करण्याचा साहेब गेल्या दोन वर्षापासून कोव्हीडमुळे सर्वसामान्य गरीब माणूस हतबल व अस्वस्थ झाला आहे आणि अनेकजण कोव्हीड मध्ये मरण पावले . त्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासन , प्रशासन , मा . मुख्यमंत्री श्री . उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अथक परिश्रम घेतले . सध्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता असल्याचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री . राजेश टोपे साहेब यांनी सावधानतेचा नारा दिला आहे .
आपण जिल्हाधिकारी या नात्याने सोलापूर शहर व जिल्हयात कोरोना पहिली व दुसरी लाट थोपविण्यासाठी फार परिश्रम घेतले आहात . आपल्याला सोलापूरच्या सर्व कार्यकर्ते जनता संपूर्ण पाठींबा दिला . असे अनेक संकटातून बाहेर पडून आता कुठे थोडे दिलासा वाटत असतांना कांही मुठभर दोन नंबर धंदेवाले भांडवल धारांच्या हितासाठी हे ताड़ी ( शिंदी ) दुकाने सुरु करण्याचा प्रयत्न राज्य प्रशासन करीत आहे . याबाबत आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा . मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , कामगार मंत्री , महसुल मंत्री , प्रधान सचिव , उत्पादन शुल्क मंत्रालय , प्रधान सचिव , कामगार राज्यमंत्री यांना समक्ष भेटून चर्चा करुन निवेदन देण्यात आली आहे . तरीही सोलापुरातील ताडी ( शिंदी ) दुकानवाले , ठेकेदार है लवकरच शासन मान्य ताडी ( शिंदी ) दुकाने पुन्हा चालू करण्यासाठी संघटीत होत आहेत .
तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती की , वरील सर्व बाब गांभीर्याने विचार करून आपण सोलापूर जिल्हाधिकारी या नात्याने शासन मान्य ताडी ( शिंदी ) दुकाने चालू करण्याचे परवानगी देऊ नये ही कळकळीची नम्र विनंती .
अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने हजारो लोकांच्या मोर्चा आपल्या कार्यालयावर काढण्यात येणार आहे कृपया याची नोंद घ्यावी.असे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस :- विष्णु कारमपुरी (महाराज) व प्रहार संघटनेचे जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मा.जिल्हाधिकारी यांना देण्याऱ्या शिष्ट मंडळात – दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, श्री.येडके, प्रसाद जगताप, रमेश चिलवेरी, संजू शेट्टी, प्रशांत जक्का, शुभम कारमपुरी, गुरुनाथ कोळी, लक्ष्मीबाई इप्पा, शोभा पोला, मिराबाई लचुवाले, राधिका इप्पा, लक्ष्मीबाई लंगडेवाले, यल्लमा पेंटा, यांच्या सह कामगार दिसत आहे.
=========================
*फोटो मॅटर :- महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस :- विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली मा. निवासी जिल्हाधिकारी मा.शमा पवार मॅडम यांना निवेदन देताना – दशरथ नंदाल, रमेश चिलवेरी,लक्ष्मीबाई इप्पा, शोभा पोला, मिराबाई लचुवाले, उपस्थित होते.*