लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने
*वरोरा* : जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मानवाधिकार सहायता संस्था महिला संघ वरोरा आणि हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्याल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात नुकताच जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रमाचे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य दिगदेवतुलवार हे होते.
मंचावर प्रमुख अतिथी म्हणून वरोरा तालुका मानवाधिकार अध्यक्ष सुनंदा पिदुरकर, अँड.हिवरकर , अँड. नकबे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
अॅड. हिवरकर यांनी महिलांवर होणारे अन्याय व अधिकार यावर प्रकाश टाकला.
सुनंदा पिदुरकर यांनी मानवाधिकारात संविधानाची भूमिका काय हे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य दिगदेवतुलवार यांनी विद्यार्थी जिवनात अधिकार आणि कर्तव्ये याची सांगळ कशी घालावी यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मानवाधिकार समितिच्या संगीता बाळबुधे, सुनिता खापने, मुळे, निता गजभे इ. ची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन टेमुडे यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक जोशी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मानवाधिकार सहायता संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी आदींनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमात बहुसंख्येने प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.