By : Mohan Bharti
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते १०० % रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम व शोष खड्डे करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. गावात १०० % रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम व शोष खड्डे होणे हे गावातील नागरिकांच्या हिताची बाब असून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून पाणी पातळी वाढवण्याकरता यामुळे मदत होईल पाण्याची समस्या दूर होईल तसेच सांडपाणी सुध्दा त्या शोषखड्ड्यामध्ये मुरवून आरोग्याच्या दृष्टीने गावातील घाण कमी होईल व गाव स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल या उदात्त हेतूने शंभर टक्के रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम व शोष खड्डे पूर्ण करण्याचा मानस सरपंच नंदकिशोर वाढई यांनी बोलून दाखविला. या प्रसंगी तमुस अध्यक्ष महादेव पाटील ताजने, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या मनोहर कावडे, ग्रा प सदस्य रंजना दिवाकर पिंगे, सुनिता ऋषी उमाटे, ग्रामसेवक नारनवरे, मनोहर कावडे, गोसाई पाटील पेटकर, मारुती खाडे, श्रावण गेडाम, शांताबाई विद्ये, मंगलाबाई पेटकर, विठ्ठल नागोसे, सुनील मेश्राम यासह समस्त गावकरी उपस्थित होते.