लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर – स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषद सदस्य पदाकरीता पार पडलेल्या निवडणूकीत भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजया मागे विद्यमान राज्य सरकारने ओबीसींचा छळ केल्याचा परिणाम असल्याची जळजळीत प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी तथा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी व्यक्त केली.
शिवसेना-काॅंग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र लढूनही त्यांना भाजपचा सामना करणे शक्य झाले नाही. एकट्या भाजपने या सर्वांना धुळ चारली असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. ओबीसींचा छळ कराल तर हेच परिणाम पुढेही भोगावे लागतील असा इशाराही हंसराज अहीर यांनी संबंधित पक्षांना दिला आहे. या निवडणूकीत निवडून आलेले भाजपाचे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे(नागपूर), वसंत खंडेलवाल(अकोला-बुलडाणा-वाशिम), अमरीश पटेल (धुळे-नंदुरबार), राजहंस सिंह(मुंबई) यांचे अभिनंदन करुन ते म्हणाले की, मनपा, न.प., जि.प., क्षेत्रातील ओबीसी जनप्रतिनिधी असलेल्या मतदारांनी तसेच काही मतदारसंघात सत्तापक्षाच्या ओबीसी नगरसेवकांनी सत्तारुढ सरकारवर ओबाीसी अन्यायाबाबत रोष व्यक्त केला असल्याचेही अहीर यांनी म्हटले आहे.
ओबीसी विरोधात अशीच भूमिका राहीली तर सरकारही पडेल असे सांगून या विजयात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, पूर्व मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे भरीव योगदान राहिले आहे. सबका साथ-सबका विकास-ओबीसींना सन्मान देणाऱ्या माननिय प्रधानमंत्राी नरेंद्र मोदी यांचेवरील हा विश्वासच आहे असेही अहीर यांनी म्हटले आहे.