सांगोला : भूमी अभिलेख उपअधीक्षक या माझ्या ओळखीच्या असून मोजणी नकाशा मिळवून देण्यासाठी 10 हजाराची लाच घेणाऱ्या खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बाळासाहेब एकनाथ केदार, रा. वासुद (अ), ता. सांगोला, जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. यातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायीक असून त्यांचे मौजे गायगव्हाण येथील गट क्र. ४१ | मधील ३२ आर जमीनीची मोजणी होवून नकाशा मिळवून देणेकरिता उप अधिक्षक भुमी अभिलेख येथे काम करीत असलेले खाजगी इसम बाळासाहेब एकनाथ केदार, रा. वासुद (अ), ता. सांगोला, जि. सोलापूर यांनी भूमि अभिलेख कार्यालय, सांगोला येथील उप अधीक्षक, मॅडम हे त्यांच्या चांगल्या परिचयाचे असून त्यामुळे आरोपी हे मोजणी नकाशा देण्याचे काम करित असल्याचे भासवून सदरचा नकाशा देण्याकरिता तक्रारदार यांना १०,००० रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी याला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असुन सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, प्रमोद पकाले, गजानन किणगी नेमणूक एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.