By : Mohan Bharti
गडचांदूर : जिल्ह्यात दारूबंदी असताना चोऱ्या चे प्रमाण अतिशय कमी झाले होते,मात्र दारूबंदी उठताच चोऱ्या चे प्रमाणात वाढ झालेली दिसत आहेत, भुरट्या चोरांनी तर शहरात हैदोस घातला आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ मधील अचानक चौकात असलेल्या सुभाष किराणा दुकान मध्यरात्रीच्या सुमारास भुरट्या चोरांनी फोडून गल्ल्यातील पैसे लंपास केले,या चोरांनी दुकानाच्या बाहेरील लाईट बंद करून दुकानाचे कुलूप लोखंडी राड ने तोंडून दुकानात प्रवेश केला, कुलूप तोडण्यासाठी वापरलेला राड काही अंतरावर सापडला आहे. या भुरट्या चोरांनी त्याच रात्री ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या कन्यका मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला,काही दिवसांपूर्वी बसस्टॉप जवळ असलेल्या मेडिकल स्टोअर मधून भर दिवसा अज्ञात चोरांनी मोबाइल लंपास केला.
पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. मात्र आता थंडी वाढत आहेत, याचा फायदा हे भुरटे चोर घेण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा पोलीस निरीक्षक यांनी शहरात रात्री ची ग्रस्त वाढवून चोऱ्या वर आळा घालावा अशी मागणी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष हंसराज चौधरी, सचिव प्रशांत गौरशेट्टीवार तथा नागरीकांनी केली आहेत,