लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕रथयात्रोचे चंद्रपूर महानगरात ठिकठिकाणी भव्य स्वागत*
चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी तसेच भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रामध्ये ओबीसी जागर अभियान अंतर्गत ओबीसी जागर रथयात्रोस चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या तालुका ठिकाणाहुन दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी तथा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर तसेच गडचिरोली चे खासदार अशोक नेते यांचे शुभहस्ते प्रारंभ झाला असून या रथयात्रोला लोकांचा विशेषतः ओबीसी समाज बांधवांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. सदर ओबीसी जागर रथयात्रोचे दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी चंद्रपूरात आगमन होत असून चंद्रपूर महानगरात या रथयात्रोचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
सदर रथयात्रोचे सकाळी 09.00 वा. बंगाली कॅम्प चैक येथे आगमन होत असून 10.00 वा. राधाकृष्ण चैक इंदीरानगर, 11.00 वा. हनुमान मंदिर चैक, इंदीरानगर, 12.00 वा. शिवमंदिर चैक शामनगर, हनुमान मंदीर चैक रमाबाईनगर येथे रथयात्रोचे स्वागत करण्यात आल्यानंतर ही रथयात्रा शिवाजी चैक रमाबाई नगर येथुन दु. 01.30 वा. तुकूम मंडळाकडे प्रस्थान करेल. दु. 03.00 वा. तुकूम येथील आझाद चैक, 04.30 वा. मातोश्री चैक, 06.00 वा. एसटी वर्कशाॅप, 07.30 वा. शिवाजी चैक, 09.00 वा. शितला माता मंदिर चैक.
दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजी ओबीसी जागर अभियान रथयात्रोचा कार्यक्रम
स. 08.00 वा जनता काॅलेज चैक, 09.30 वा संत कंवलराम चैक, 10.45 वा सवारी बंगला चैक, 11.45 वा जटपुरा गेट चैक, 01.00 वा जुनोना चैक बाबुपेठ, दु. 02.00 वा नेताजी चैक बाबुपेठ, 03.00 वा बागला चैक भिवापुर, 04.00 वा माता नगर चैक भिवापुर, सायं. 05.00 वा जोडदेऊळ चैक पठानपुरा, 06.00 वा विठ्ठल मंदीर व्यायामशाळा, 07.00 वा गांधी चैक, 08.00 वा छोटा बाजार चैक, 09.00 वा. गंजवार्ड चैक.
ओबीसी जागर रथयात्रोच्या या कार्यक्रमाव्दारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा तसेच या सरकारच्या सर्व आघाड्यांवरील अपयशाविरूध्द जागर करून निषेध नोंदविण्यात येत असल्याने या ओबीसी जागर रथयात्रोत ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी जागर रथयात्रोच्या संयोजकांनी तसेच भाजपा, भाजयुमो, भाजपा महिला आघाडी, ओबीसी मोर्चाच्या चंद्रपूर महानगर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.